नाशिक

धुळ्यात अंनिस प्रशिक्षण

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. अँकर -- फोटो क्रमांक : 33181 धुळे : महाराष्ट्र अंनिसतर्फे झालेल्या चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण शिबिरात विविध चमत्कारांचे प्रात्यक्षिक दाखवताना तज्ज्ञ मार्गदर्शक. शेजारी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते. -- ‘अंनिस’तर्फे धुळ्यात चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण -- अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कार्यकर्त्यांचा पुढाकार -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २१ : समाजात दैवी शक्तीचा दावा करून भोंदू बाबांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती धुळे शाखेतर्फे कार्यकर्त्यांसाठी चमत्कार प्रयोग सादरीकरण प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. पांझरा नदीकिनाऱ्यावरील मराठा सेवा संघाच्या सभागृहात हे शिबीर झाले. - जगात कोणताही चमत्कार नसून प्रत्येक चमत्कारामागे वैज्ञानिक तत्त्व, रासायनिक अभिक्रिया, हातचलाखी किंवा सरावाने आत्मसात केलेले शारीरिक कौशल्य असते. कार्यकर्त्यांनी हे प्रयोग शिकल्यास रंजक पद्धतीने शास्त्रीय दृष्टिकोन रुजवणे सोपे जाते. विशेषतः अशिक्षित व अल्पशिक्षित घटकांची होणारी आर्थिक, मानसिक व लैंगिक फसवणूक थांबवण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. सहभागी कार्यकर्त्यांना २० विविध चमत्कारांचे प्रयोग, त्यामागील विज्ञान, हातचलाखी, प्रयोग सफाईदारपणे सादर करण्याचे तंत्र, घ्यावयाची दक्षता, मांडणी व प्रबोधनात्मक मुद्दे याचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. - शिबिरासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून अंनिस राज्य प्रशिक्षण विभागाचे कार्यवाह कीर्तिवर्धन तायडे व नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी उपस्थित होते. संघटनेचे राज्य कार्यवाह प्रा. परेश शाह यांनी संघटित कामाचे महत्त्व व बुवाबाजीच्या बदलत्या स्वरूपावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी दस्तऐवज संकलन विभागाचे राज्य सहकार्यवाह डॉ. सुरेश बिराडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शरद वाणी, जिल्हा प्रधान सचिव नवल ठाकरे, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभागाचे जिल्हा कार्यवाह प्रा. रणजित शिंदे, विविध उपक्रम विभागाचे दिलीप खिवसरा, धुळे शाखेचे प्रधान सचिव शंकर सगरे, शाखा कार्याध्यक्ष स्वप्निल खैरनार, प्रधान सचिव नितीन बागूल, क्रियाशील सदस्य शरद मोरे, हृदयनाश मोरे, रितेश ठाकरे उपस्थित होते. शाहूराजे शिंदे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘या घरात तुझ्या कार्यासाठी येईन असं वाटलं नव्हतं…’ नाना पाटेकरांच्या पुतण्याची पोस्ट चर्चेत; फार्म हाऊसमधील फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

SCROLL FOR NEXT