Felicitation
Felicitation esakal
नाशिक

मॅजिकल तारखेला मॅजिकल विश्‍वविक्रम! OMG बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली दखल

अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : आकाश भाबड यांनी 22-02-2022 या मॅजिकल तारखेला एक अनोखा मॅजिकल विश्‍वविक्रम केला. त्यांनी त्यांच्या कंपनी ‘एबीसीडी’ इंटरनॅशनलच्या व्यासपीठावर एकामागून एक 22 देशातील 22 एज्युकेटर्स आणि उद्योजकांच्या 22 मिनिटांच्या विशेष मुलाखती घेतल्या.

OMG बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली दखल

या कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व शिक्षक अनुभवी आणि आपापल्या देशातील अव्वल शिक्षकांच्या यादीत समाविष्ट आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम 11 तासांत पूर्ण झाला. हा विश्‍वविक्रम आकाश भाबड आणि कंपनी ‘एबीसीडी’ इंटरनॅशनल यांचा दुसरा विश्‍वविक्रम आहे. याची पुन्हा एकदा ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने दखल घेत आकाश भाबड यांचा ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देवून सन्मान केला.

भारतासह अमेरिका(America), कॅनडा (Canada), ग्रीस (Greece), अर्जेंटिना (Argentina), मलेशिया (Malaysia), इटली (Italy), रोमानिया (Romania), आर्मेनिया, तैवान, पेरू, अमेरिका, मॉरिशस, रशिया (Russia), जॉर्जिया, लेबनॉन, भूतान, ब्राझील, मॅसेडोनिया, दक्षिण आफ्रिका (South Africa), बांगलादेश, नायजेरिया आणि श्रीलंका या देशातील एज्युकेटर्स सहभागी झाले होते. रेकॉर्ड इव्हेंट, एबीसीडी इंटरनॅशनल कंपनीचा हा विश्‍वविक्रम जगातील विविध देशांतील एज्युकेटर्सला एका व्यासपीठावर आणण्याचे कारण ठरला. ज्याच्या मदतीने हे सर्व जागतिक एज्युकेटर्स शिक्षणाविषयी त्यांचे विचार व्यक्त करू शकतात. या सर्व एज्युकेटर्सने त्यांचे अनुभव, ज्ञान, यशाची रहस्य आणि त्यांचा शिक्षण, शिक्षण पद्धती आणि शिक्षकांच्या प्रती दृष्टिकोन मुलाखतीच्या माध्यमातून जगासमोर ठेवला.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व उपक्रम क्रमांक 22 आणि 2 शी संबंधित होते. या कार्यक्रमाची सहयोगी भागीदार कंपनी ‘भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन’ने याप्रसंगी 8 पुस्तके प्रकाशित झाली. यामध्ये भारतासह आर्मेनिया, झिम्बाब्वे आणि रोमानिया येथील लेखकांचा समावेश होता. आकाश हे स्वतः लाईफ कोच आणि बिझनेस कोच म्हणून काम करत आहे. ते ऑथर्स सक्सेस कोचसुद्धा आहेत. त्यांची कंपनी ‘भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन’ एक महिन्यातच वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर कंपनी बनली आहे. विविध लोकांकडून त्यांना शुभेच्छा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

सत्कार समारंभासाठी श्री. भाबड यांच्यासह आई- वडिलांना देखील आमंत्रित केले होते. मनमाड येथे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, समाजसेवक विलास कटारे, विक्की सुरवसे, भय्या घुगे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT