esakal
नाशिक

Nashik: जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्‍या ‘मायाजाल’चे प्रयोग! कालिदास कलामंदिरात शनिवार, रविवारी मेजवानी

खास प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये प्रथमच व्‍यासपीठावर आक्राळविक्राळ जापनीज डायनोसोरसोबत जादूगार जितेंद्र रघुवीर यांची लढत बघायला मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : खास प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये प्रथमच व्‍यासपीठावर आक्राळविक्राळ जापनीज डायनोसोरसोबत जादूगार जितेंद्र रघुवीर यांची लढत बघायला मिळणार आहे.

अमेरिकेतून आणलेला नवीन जादू ‘मायाजाल’ चा प्रयोग शनिवारी (ता. २७) व रविवारी (ता. २८) महाकवी कालिदास कलामंदिरात अनुभवायला मिळणार आहे. (Magician Jitendra Raghuvir Mayajaal experiments Feast at Kalidas Kalamandir on Saturday Sunday Nashik)

जगप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर यांचे सर्व कुटुंबासाठी मनोरंजक जादूचे प्रयोग मायाजाल, होम मिनिस्टर, सुर नवा ध्यास नवा, कॉमेडी एक्स्प्रेस, एबीपी माझा कट्टा, खाली डोकं वर पाय, आम्ही सारे खवय्ये, खुपते तिथे गुप्ते आणि चला हवा येऊ द्या यांवर गाजलेले नवीन जादूचे प्रयोग बघण्याची संधी असणार आहे.

शनिवारी (ता. २७) सायंकाळी साडेपाचला आणि रविवारी (ता.२८) दुपारी साडेबाराला महाकवी कालिदास कलामंदिरात खास दोन शोज आयोजित केले आहेत. जादूगार रघुवीर- विजय-जितेंद्र रघुवीर पिता-पुत्राचा हा विक्रमी १५९७४ आणि १५९७५ वे प्रयोग आहेत.

कै. जादूगार रघुवीर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त वेगवेगळ्या देशातून आणलेल्या भव्य जादू या दोन्ही शोजमध्ये सादर केले जातील.

प्रदीर्घ कालावधीनंतर अनेक नवीन ट्रिक्स, नवीन सेटसह सादर केला जाणारा जादूचा शो अनेक नवीन जादूसह नुकतेच जादूगार जितेंद्र रघुवीर युरोप, अमेरिकेत आणि सिंगापूर यशस्वी दौरा करून आले.

तिथून आणलेल्या नवीन जादू यानिमित्त अनुभवता येतील. शालेय विद्यार्थ्यांना तिकिटामागे शंभर रुपयांची सवलत दिली जाणार आहे.

असे असेल आकर्षण-

कार्यक्रमामध्ये भुताचा नाच बघायला मिळेल. तसेच शोमध्ये नवीन पद्धतीने माणसाचे दोन तुकडे करून परत जोडणे, मायक्रोवेव्ह मॅजिक, रिंग ओ मॅजिक, स्वोर्ड कॅबिनेट, अनेक नवीन जादू तसेच शून्यातून विश्वनिर्मिती, आर्म इल्युजन, हुदिनी बॉक्स, ट्यूब झ्याक, प्रेक्षकातील मुलगी हवेत अधांतरी, नोटांचा पाऊस आदी प्रयोग बघायला मिळतील.

तिकिटांसाठी कालिदास कलामंदिर येथे भेट देण्याचे किंवा आनंद जाधव (९४२२७७६३८४, ९८२२७७७५२७) तसेच ऑनलाइन पद्धतीने बुक माय शोवर बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचा आनंद लुटण्याचे आवाहन आयोजक राजेंद्र जाधव, आनंद जाधव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : मोबाईलवरील ट्रॅफिक E Challan इग्नोर केल्यास थेट दोन प्रकारची कायदेशीर कारवाई; १९ लाख चलन थकित, ४१० कोटींच्या वसुलीची मोहीम

Meghalaya Assembly : आमदार पत्नी मुख्यमंत्र्यांना विकासाच्या मुद्द्यावर सभागृहातच नडली, विधानसभेत पाहायला मिळाले अचंबित करणारे दृश्य

पाय घसरला आणि.., पडता पडता थोडक्यात वाचली जेनिलिया, सोशल मीडियावर Viral Video

VIDEO : अवघ्या २४ तासांत भयंकर चक्रीवादळ! हिंदी महासागरात होरासियो Category 5 वादळ, होणार गंभीर परिणाम, डोळे फिरवणारा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Traffic Fine: गाडी पुण्यात, चालान नागपुरात; वाहतूक पोलिस विभागाचा अजब कारभार

SCROLL FOR NEXT