Court eakal
नाशिक

डॉक्टरला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; न्यायदंडाधिकारी

विनोद बेदरकर

नाशिक : डॉक्टर पतीसह त्याच्या भाडेकरू महिलेस मारहाण करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने म्हसरुळ पोलिसांना दिले आहे. न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) सचिन निकम यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर हा आदेश दिला आहे.

तक्रारदार डॉ. अतुल किशोर सोनवणे हे १४ ऑगस्ट २०२१ ला म्हसरूळला एका रुग्णाच्या उपचारासाठी गेले असता त्यांची पत्नी संशयित हेमांगी अतुल सोनवणे, सासरे वाल्मीक धोंडू वडगे तसेच अक्षय वाल्मीक वडगे, सचिन वाल्मीक वडगे, अशा वाल्मीक वडगे, मनिषा मोरे, सुनीता खैरे, माया केशव शेलार, भावळा रौंदळ, बंटी ऊर्फ अमोल रौंदळ यांनी एकत्र येऊन डॉक्टर अतुल यांना जबर मारहाण केली होती. त्याबाबत त्यांनी न्यायालयात पुरावे दाखल केले. त्यानुसार न्यायालयाने वरील संशयितांविरुद्ध म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा. तसेच १० मार्चपासून पुढील दोन महिन्यात अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. तक्रारदार डॉक्टरच्या वतीने अॅड. संतोष तरसे यांनी कामकाज बघितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT