Shiv Sena party chief Uddhav Thackeray, neighbors Rashmi Thackeray, Aditya Thackeray, Tejas Thackeray and office bearers during aarti at Shri Kalaram temple on Monday. esakal
नाशिक

Nashik Kalaram Mandir Maha Aarti: उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात महाआरती

शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व कुटुंबियांच्या उपस्थितीत आज पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात सायंकाळी महाआरती झाली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व कुटुंबियांच्या उपस्थितीत आज पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात सायंकाळी महाआरती झाली.

यावेळी ठाकरे कुटुंबाने संकल्पपूजनही केले. विश्‍वस्त मंडळातर्फे ठाकरे कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाभरातील हजारो शिवसैनिक श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे उपस्थित होते. महाआरतीनंतर श्री. ठाकरे यांच्या मोटारींचा ताफा रामतीर्थाकडे मार्गस्थ झाला. (Maha Aarti at Shri Kalaram Mandir in presence of Uddhav Thackeray family nashik political news)

श्री काळाराम देवस्थानचे नरेश पुजारी, मंगेश पुजारी, प्रणव पुजारी यांनी पौरोहित्य केले. महाआरती व संकल्पपूर्तीनंतर विश्‍वस्तांसह उद्धव ठाकरे, रश्‍मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

मंदार जानोरकर, ॲड. अजय निकम, शुभम मंत्री आदी विश्‍वस्त उपस्थित होते. ठाकरे परिवारासोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छबी टिपण्यासाठी चढाओढ

पूजेनंतर ठाकरे कुटुंब राममंदिराच्या पूर्व दरवाजाने बाहेर पडताच याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी जल्लोष केला.

उद्धव ठाकरे यांची छबी मोबाईलमध्ये घेण्यासाठी कार्यकर्त्यांत मोठी चढाओढ लागली होती. महिला शिवसैनिकही उपस्थित होत्या. आदित्य ठाकरे यांनी गाडीबाहेर येत शिवसैनिकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT