Maha CET Cell Application esakal
नाशिक

Maha CET Cell Application : व्‍यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे अपडेट्‌स ‘ॲप’वर!

सकाळ वृत्तसेवा

Maha CET Cell Application : वेगवेगळ्या व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांच्‍या सुविधेसाठी राज्‍य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ‘महा सीईटी सेल’ हे मोबाईल ॲप्‍शिलकेशन विकसीत केले असून, हे ॲप सध्या प्‍ले-स्‍टोअरवर उपलब्‍ध आहे.

या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील रियल टाईम अपडेट्‌स मिळण्यास मदत होणार आहे. सद्यःस्‍थितीत केवळ एक हजार वापरकर्त्यांनीच हे ॲप डाउनलोड केले आहे. (Maha CET Cell Application Vocational Course Admission Updates on App nashik news)

तंत्रशिक्षण, कृषी, वैद्यकीय अशा विविध अभ्यासक्रमांच्या पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. सीईटी सेलमार्फत घेतलेल्‍या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, प्रवेश नोंदणी प्रक्रियेला सुरवात झालेली आहे.

पुढील टप्‍यात प्रवेश फेऱ्या पार पडणार आहेत. या प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्‍या घडमोडींची माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्‍ध व्‍हावी, यासाठी सीईटी सेलतर्फे ‘महा सीईटी सेल’ हे मोबाईल ॲप्‍लिकेशन विकसीत केले आहे.

हे ॲप डाउनलोड करुन विद्यार्थ्यांनी आपली प्राथमिक माहिती दाखल करायची आहे. यानंतर संबंधित अभ्यासक्रमाशी निगडीत घडामोडींचे रियल टाईम अपडेट्‌स विद्यार्थ्यांना नोटीफीकेशनच्‍या माध्यमातून उपलब्‍ध करुन दिले जाणार असल्‍याचा दावा सीईटी सेलने केला आहे.

अपडेट्‌ससाठी लॉग-इन आवश्‍यक

मोबाईल ॲप डाउनलोड केल्‍यानंतर अभ्यासक्रमाचा विभागनिहाय इंटरफेस बघायला मिळतो. यामध्ये तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, फाईन आर्ट, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण व आयुष शिक्षण या विभागांचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विद्यार्थ्यांनी त्‍यांच्‍या विभागाची निवड केल्‍यानंतर पदवी, पदव्‍युत्तर पदवी असे पर्याय उपलब्‍ध होतात. तेथून शिक्षणक्रमाची निवड केल्‍यानंतर विद्यार्थ्यांना ॲप्‍शिकेशन आयडी किंवा लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करुन लॉगइन करणे आवश्‍यक आहे.

यानंतर त्‍यांना त्‍यांच्‍या अर्जासंदर्भात सूचना वेळोवेळी उपलब्‍ध होऊ शकतील. याशिवाय सीईटी सेलच्‍या युट्यूब, फेसबुक व ट्विटरला भेट देण्याची हायपर लिंक ॲपवर उपलब्‍ध आहे.

या उणिवांमध्ये सुधारणांची गरज

* सध्या ॲप ॲण्ड्राईडवर असून, आयओएसवर व्‍हावे उपलब्‍ध

* इम्पॉर्टंट लिंक (महत्त्वाचे दुवे)ची निवड केल्‍यास काहीही प्रतिसाद नाही

* प्रश्‍नोत्तराच्‍या (एफएक्‍यू) विभागात माहिती उपलब्‍ध नाही

* संपर्कामध्ये केवळ सोशल मिडीयाची माहिती, संपर्क क्रमांक नमूद करण्याची आवश्‍यकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT