Sharad Pawar & Uddhav Thackeray esakal
नाशिक

Nashik: लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा ‘फॉर्म्युला’ निश्‍चित? नाशिकमध्ये ठाकरे, तर दिंडोरीत NCP शरद पवार गटाकडून तयारी

नाशिक शिवसेनेच्या ठाकरे गट, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याचा ‘फॉर्म्युला’ जवळपास निश्‍चित झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

अद्याप राजकीय पक्षांचे जागावाटप निश्‍चित झाले नसले, तरी महाविकास आघाडीकडून नाशिक शिवसेनेच्या ठाकरे गट, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याचा ‘फॉर्म्युला’ जवळपास निश्‍चित झाल्याचे बोलले जात आहे. (Maha Vikas Aghadi formula for Lok Sabha confirmed Thackeray in Nashik NCP in Dindori by Sharad Pawar faction Nashik)

एप्रिल किंवा मेमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली. सन २०१९ नंतर राज्याचे राजकारण बदलले. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्येही बदल झाले आहेत.

महायुतीत पूर्वी शिवसेना ठाकरे गट सहभागी होता; परंतु महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर घटक पक्षांची घरेही बदलली. राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाल्यावर शिवसेना व भाजप युती तुटली.

कालांतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा स्वतंत्र गट स्थापन झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडून पुढे अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सहभागी आहे.

आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना जागावाटपाचे सूत्र निश्‍चित केले जात आहे. महाविकास आघाडीत नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविण्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून पारंपरिक पद्धतीने नाशिकची जागा लढविण्याची तयारी सुरू झाली.

आघाडीत फूट, सूत्रे मात्र जुनेच

महाविकास आघाडीकडून जागांची घोषणा झाली नसली, तरी मिळालेल्या माहितीनुसार नाशिकची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनच लढविली जाणार आहे. दिंडोरी लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून लढविण्याचा ‘फॉर्म्युला’ निश्‍चित झाला.

महायुतीत शिवसेनेला नाशिकची जागा, तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला दिंडोरीची जागा होती. या दोन्ही पक्षांत फूट पडली असली, तरी जागावाटपाचे सूत्र मात्र युती व आघाडीच्या काळात जे होते, तेच राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: सुरतमध्ये अपहरण, मुंबईत संपवलं; पण कुणी? कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयात सापडलेल्या ५ वर्षीय मुलाच्या मृतदेहाचं कोडं उलगडलं

'Vaibhav Suryavanshi ला फार सल्ले द्यायला जाऊ नका...', रायुडू असं का म्हणाला? वाचा

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Palghar News: भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT