mosam river mahadev pindi.jpg 
नाशिक

चमत्कारच..! नदीजवळ जेव्हा अचानक महादेवाच्या पिंडीचे व नागाचे अवशेष सापडतात तेव्हा.. भाविकांमध्ये चर्चेला उधाण

दीपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / अंबासन : गाव व परिसरात आषाढी नंतर महीला भगिनी नदीपात्रातील आई माऊलींच्या नवसपुर्तीसाठी गर्दी करीत आहेत. शुक्रवार (ता.३) सकाळ पासुनच नदीपात्रातील जुन्या पुलाजवळ असलेल्या आई माऊलींच्या दर्शनासाठी अकराच्या सुमारास प्रमोद कोर हे आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी जात असताना फर्ची पुलाच्या एका कोप-याजवळ जेव्हा महादेवाची पिंड सापडली...तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता..

....अन् बातमी गावात वा-यासह पसरली

आषाढी एकादशी नंतर महिला भगिनी मोसम नदीपात्रातील आई माऊलींच्या नवसपुर्तीसाठी गर्दी करीत आहेत. शुक्रवार (ता.३) सकाळ पासुनच मोसम नदीपात्रातील जुन्या फर्ची पुलाजवळ असलेल्या आई माऊलींच्या दर्शनासाठी अकराच्या सुमारास प्रमोद कोर हे आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी जात असताना फर्ची पुलाच्या एका कोप-याजवळ महादेवाची पिंड निदर्शनास आली. यावेळी गावातील करण रामोळे यांनी व काही तरूणांनी मिळालेले दगडी पिंडीचे अवशेष बाहेर काढले. त्याच ठिकाणी नंदी आणि सिमेंटने बनलेला नागाचे भग्नावस्थेत मुर्ती आढळून आल्या. तरूणांनी लागलीच चिखलमातीत माखलेले अवशेष पाण्याने धुवून नदीकाठावर सुरक्षित जागेवर ठेवले. नदीपात्रात महादेव पिंडीसह नंदी नागाची मुर्ती आढळून आल्याची बातमी गावात वा-यासह पसरली होती. त्यामुळे बघ्यांनी एकच गर्दी केली.

होमहवनसह प्राणप्रतिष्ठा

पूर्वीच्या काळात या ठिकाणी कुठलेही मंदिर नसल्याने मुर्त्या आल्या कुठून असा अंदाज नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. बहुतेक पुर्वी फर्ची पुलाचे काम करतांना वाहनातून भरावाबरोबर दगडी मुर्ती आल्या असाव्यात तर काहींनी नदीच्या पुरातून एखाद्या मंदीरातील वाहुन आल्या असाव्या असे अंदाज लावले जात आहेत. या सापडलेल्या मुर्तीना कोर यांनी नवसपुर्तीसाठी साकडे घातले आणि पुर्ण होताच त्याच ठिकाणी छोट्याखानी मंदिर तयार करून होमहवनसह प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.  

चर्चेला उधाण

येथील मोसम नदीपात्रातील बंद असलेल्या जुन्या फर्ची पुलाजवळ तरूणांना दगडी महादेवाची पिंड, नंदी व सिमेंट काँक्रीटचा नाग अशा मुर्तीचे भग्नावस्थेत अवशेष आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरूणांनी चिखलमातीत माखलेले अवशेष पाण्याने स्वच्छ करून नदीकाठी सुरक्षित ठिकाणी ठेऊन पुजा केली. सर्वच अवशेष एकाच ठिकाणी सापडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

नदीकाठी सुरक्षित ठिकाणी ठेवले
आम्ही मोसम नदीपात्रातील आई माऊलींच्या दर्शनासाठी जात असताना महादेवाची दगडी पिंड निदर्शनास आली त्याच पाठोपाठ नंदी सिमेंट काँक्रीटचा नाग आढळून आले. आम्ही बाहेर काढले पाण्याने स्वच्छ करून नदीकाठी सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत. - प्रमोद कोर, अंबासन 


 मुर्तीचे अवशेष सापडले तेव्हा पहिलीच पुजा करण्याचा मान मिळाला. यामुळे आनंद झाला. मुर्तीचे प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.- प्रतिभा खैरनार, अंबासन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT