Mahalaxmi Puja esakal
नाशिक

Nashik News : महालक्ष्मी व्रत पूजेस आजपासून प्रारंभ; कुमारिकांसह महिलांची सुख- संपत्तीसाठी आराधना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मार्गशीर्षमधील गुरुवारच्या महालक्ष्मी व्रत पूजेला आजपासून सुरवात झाली. व्रताद्वारे कुमारिका व महिलांनी सुख, संपत्‍ती व समृद्धीसाठी आराधना केली. त्यानिमित्ताने दिवसभर उपवास करून सायंकाळी खीर अथवा गोड नैवेद्य दाखवून महालक्ष्मीची आरती करत कुटुंबासमवेत भोजन केले. महिन्यातील चार गुरुवारी हे व्रत केले जाईल. (Mahalakshmi fast pooja starts from today Worship of women with virgins for pleasure wealth Nashik Latest Marathi News)

घराच्या अंगणाची आणि घराची सकाळी साफसफाई करून रांगोळीने घराचा आवार सजविण्यात आला. तसेच, पूजेसाठी पत्री आणून गणेश पूजन करत कलशातील शुद्ध पाण्यात पत्रीच्या मधोमध श्रीफळ ठेवत पूजन करण्यात आले. सभोवताली लक्ष्मीची पावले व रंगीत रांगोळी काढून लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मी श्रीयंत्र पुढे ठेवण्यात आले. महालक्ष्मी व्रत कथा अथवा माहात्‍म्‍याचे वाचन करून महालक्ष्मीची षोडशोपचारे पूजा करण्यात आली.

फळे, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवण्यात आला. आरती, धूप-दीप करण्यात आले. व्रताने घरातील वातावरण प्रसन्नदायी झाल्याची अनुभूती कुटुंबांनी घेतली. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पाच कुमारिका अथवा सुसाविनींना निमंत्रित करून हळद-कुंकू लावत त्‍यांची पूजा केला जाईल. त्यांच्यासाठी भोजनाची अथवा फळे, दक्षिणा व व्रत कथा पुस्तक देवून व्रताची सांगता केली जाईल.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

महालक्ष्मीची आरती

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।

वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥

जय देवी जय देवी...॥

"मार्गशीर्षाच्या पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केल्याने खूप प्रसन्न वाटते. दिवसभर घरात वातावरण प्रसन्नदायी राहिले. त्याचे समाधान वाटते."

- ज्योती निकुंभ, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS Rally : संघाच्या मिरवणुकीत हातात काठी घेऊन गणवेश घालून सहभाग घेणारा सरकारी अधिकारी निलंबित; राज्यात वादाची ठिणगी!

Nagpur Accident : दुर्दैवी घटना! 'स्कूलबसच्या चाकाखाली आल्याने चिमुकल्याचा मृत्यू'; कुटुंबियांचा आक्राेश, पार्थ धावला अन्..

ODI ऐवजी T20 मॅच! लंकेला नमवून दक्षिण आफ्रिकेचा विजयी चौकार, भारताची धाकधूक वाढली, टॉप४ चं गणित बिघडणार?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२६ मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेतील ‘टीडीआर’ मिळणार ९० दिवसांत; एक नोव्हेंबरपासून आदेशाची अंमलबजावणी हाेणार

SCROLL FOR NEXT