नाशिक

आयुक्त जाधव यांच्यासह तिघांना जामीन मंजूर

CD
३०-२ आयुक्त जाधव यांच्यासह तिघांचा जामीन अर्ज मंजूर ------------- सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता.४ ः लाचेची मागणी केल्याप्रकरणी येथील महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, स्वीय साहाय्यक नीलेश पाटील व लेखाधिकारी हरीश डिंबर यांना येथील न्यायालयाने बुधवारी (ता. ४) जामीन मंजूर केला. प्रत्येकाला ५० हजाराची सुरक्षा अनामत भरणे व ५० हजाराच्या जातमुचलक्यावर तसेच आठवड्यातून तीन दिवस लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तक्रारदार ठेकेदाराकडून दोन कामांचे २० लाखाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ४ टक्केप्रमाणे ८० हजार रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २९ ऑक्टोबरला तिघांना अटक केली होती. आयुक्त जाधव, स्वीय साहाय्यक नीलेश पाटील व लेखाधिकारी हरिष डिंबर या तिघांविरुद्ध किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी केलेल्या घर झडतीत लेखाधिकारी डिंबर यांच्याकडे काही रक्कम सापडली होती. मात्र आयुक्त जाधव व स्वीय साहाय्यक नीलेश पाटील यांच्याकडे कोणतीही रोकड सापडली नव्हती. तिघा संशयित आरोपींतर्फे ॲड वासिफ यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. फिर्यादीतील नोंदीचा आधार घेत तिघांनी कथित लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट होत नसल्याचे ॲड वासिफ यांनी युक्तिवादात सांगितले. गुन्ह्याचा तपास देखील जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे तिघांचा जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती न्यायालयाला केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आयुक्तांसह तिघांचा जामीन अर्ज मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार मुंबईतील ब्रीजकँडी रुग्णालयात दाखल

Pune News: CSR निधीतून सुविधा देऊन खासगी बँकांकडून कोट्यवधींच्या ठेवींची जुळवाजुळव? अनास्करांची RBI कडे तक्रार

Jalna News: तहसीलदारांसमोरच लिपिक अन् कोतवाल भिडले! अंबड तहसील कार्यालयात फ्रीस्टाइल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT