Mahant Narendra Giri Suicide Inquiry Demands of Saints esakal
नाशिक

महंत नरेंद्रगिरींच्या आत्महत्येच्या चौकशीची साधुसंतांची मागणी

दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा नाशिक व कैलास मठाशी जवळचा संबंध होता. महाराज आत्महत्या करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची सीबीआय (CBI) किंवा तत्सम यंत्रणेद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी पेठ रोडवरील कैलास मठाचे प्रमुख महंत संविदानंद सरस्वती यांच्यासह अन्य साधुसंतांनी केली.

त्र्यंबकेश्‍वरच्या कुंभमेळ्यात त्यांनी नोंदविला होता सहभाग

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा सोमवारी (ता. २०) उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आश्रमातील राहत्या जागेत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. महंत नरेंद्रगिरी हे पंचायती निरंजन आखाड्याचे प्रमुख महंत होते. याशिवाय गत आठ वर्षांपासून अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते. त्र्यंबकेश्‍वर येथे १०१५ ला पार पडलेला कुंभमेळ्यासह चार महिन्यांपूर्वी हरिद्वार येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यातही त्यांनी सहभाग नोंदविला होता. याबाबत कैलास मठात साधुसंतांच्या उपस्थितीत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा त्र्यंबकेश्‍वरसह नाशिकच्या कैलास मठाशी निकटचा संबंध होता. त्यांच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला जात असून, त्याबाबत सीबीआय किंवा तत्सम यंत्रणेद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी महंत संविदानंद सरस्वती यांनी केली आहे.

सर्वसाधारण साधुसंतांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थीत

महाराजांशी आपला गत पंचवीस ते तीस वर्षांपासून संबंध होते, ते आत्महत्या करणार नाहीत, त्यामुळे ही चौकशी निष्पक्षपाती व्हावी, अशी मागणी स्वामी सरस्वती यांनी केली. आसाराम बापूंसह रामपाल, राधे माँ सारख्या संतांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करणाऱ्या महंत नरेंद्रगिरी महाराजांच्या कथित आत्महत्येची चौकशी व्हावी, अशी मागणी अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी केली. आखाडा परिषदेच्या अध्यक्षांचा मृत्यू याप्रकारे होत असेलतर सर्वसाधारण साधुसंतांच्या सुरक्षेचे काय, त्यामुळे त्यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी पंचमुखी हनुमान आखाड्याचे प्रमुख महंत भक्तिचरणदास यांनी केली. श्रद्धांजली सभेला रामतीर्थ महाराजांसह अनेक साधुसंत, आखाडा परिषदेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT