नाशिक

पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार दत्ताकाका उगावकर

CD
फोटो : H33754, H33755 दत्ताकाका उगावकर यांना पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार नाशिक, ता. २८ : ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’ तर्फे देण्यात येणाऱ्या २०२६ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा झाली असून, यंदा पक्षिमित्र जीवनगौरव पुरस्कार निफाड येथील दत्ताकाका उगावकर, र पत्रकारिता पुरस्कार प्रा. आनंद बोरा यांना जाहीर झाला आहे. इतर पुरस्कारांपैकी पक्षीसंवर्धन व शुश्रूषा पुरस्कार ताडदेव, मुंबई येथील मेघना दुर्वे मिश्रा यांना, पक्षी जनजागृती पुरस्कार ताडोबा चंद्रपूर येथील पक्ष्यांचे आवाज काढून पक्षी संवर्धनाची जनजागृती करणारे सुमेध वाघमारे, तसेच पेठ वडगाव येथील निसर्गप्रेमी मित्रमंडळ या संस्थेस जाहीर झाला आहे. पक्षी संशोधन पुरस्कार या गटातील पुरस्कार यावर्षी सोलापूर येथील राहुल वंजारी यांना जाहीर झाला आहे. यंदा प्रथमच दिला जाणारा पहिला पक्षी पत्रकारिता पुरस्कार नाशिक येथील पक्षीमित्र प्रा. आनंद बोरा व अकोला येथील विश्वास देशमुख यांना जाहीर झाला. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारांचे वितरण २६ व २७ डिसेंबर दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या ३९ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट! किती टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता?

टीम इंडियाला मोठा झटका! प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

‘ये प्रेम मोल लिया’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा भन्नाट डान्स, सोबतीला होती ही मराठी अभिनेत्री, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : दिवाळीनंतर इंडिया आघाडीची सभा घ्या; दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र

Diwali Bonus Laws: कायमस्वरूपीच नव्हे, प्रोबेशनवरील कर्मचाऱ्यांनाही मिळू शकतो बोनस! जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT