नाशिक

महाराष्ट्र चेंबर बैठक

CD
फोटो : H32179 ------------ व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर सरसावले शासकीय विभागांसोबत बैठक घेणार; तोडगा काढण्याचे आश्वासन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाया, मार्केट सेस, बँकांचे अतिरिक्त चार्जेस आणि फिरत्या दुकानांमुळे निर्माण होणारी स्पर्धा अशा अनेक समस्यांनी किरकोळ व्यापारी त्रस्त झाले आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने पुढाकार घेतला आहे. ‘आवाज उद्योजकांचा- व्यापाऱ्यांचा, साथ महाराष्ट्र चेंबरची’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र चेंबर आणि नवीन नाशिक किरकोळ धान्य किराणा व्यापारी संघटनेची संयुक्त बैठक सोमवारी (ता. १२) महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात पार पडली. बैठकीत व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे राज्य मुख्य समन्वयक वेदांशू पाटील, नाशिक शाखेचे चेअरमन सचिन शहा, को-चेअरमन दिपाली चांडक, सुरेश चावला आणि जिल्हा समन्वयक भावेश मानेक यांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. या समस्या सोडवण्यासाठी संबंधित शासकीय विभागांशी पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष बैठका घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन चेंबरने दिले. राज्य मुख्य समन्वयक वेदांशू पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आयुक्त तुकाराम मुंडे आणि संजय खंदारे यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. चेअरमन सचिन शहा यांनी या अभियानाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्री झिरवाळ यांची भेट घेऊन समस्या मांडल्या असून, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांच्या पुढाकाराने व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्प डेस्क सुरू करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी या हेल्प डेस्कवर कळवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष सुरेश खाबिया, माजी अध्यक्ष नाना जाधव, बळिराम शिरोडे, महेंद्र विभांडिक, निवृत्ती शिरुडे, शरद दातीर, नाना काळे, रोशन सोनवणे, अमोल दशपुते, धीरज पटेल, वैभव अमृतकर, समर्थ भुसारे, चेतन मुसळे, रामदास ठोंबरे आणि चेंबरचे कार्यकारिणी सदस्य वासुदेव भगत उपस्थित होते. ---------------------- व्यापाऱ्यांच्या व्यथा किरकोळ व्यापारी केवळ एक-दोन टक्के नफ्यावर व्यवसाय करत असताना विविध विभागांच्या कारवायांमुळे व्यापार करणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. प्लास्टिक बंदीबाबत महापालिकेची कारवाई, प्रदूषण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाच्या जाचक कारवाया, फिरत्या दुकानांमुळे होणारी स्पर्धा, मार्केट सेस आणि बँकांकडून आकारले जाणारे चार्जेस यामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anganwadi Sevika Promotion : अंगणवाडी सेविकांसाठी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! वयोमर्यादेचा अडथळा दूर, 55 वर्षांपर्यंतच्या सेविकांना मिळणार पदोन्नती, 'ती' अट रद्द

मालाड स्टेशनवर चुकीचा स्पर्श, पुन्हा तेच करायला आला... प्राप्ती रेडकरने सांगितला तो प्रसंग; म्हणते- मी थेट त्याची...

Maharashtra Live News : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू

पूरा इंडिया, अब दुबई आ रहा है! सूर्यकुमार यादवने Dubaiत खरेदी केलं घर, कारणही सांगितलं.. म्हणाला, इथे जी सुरक्षा मिळतेय...

Kagal to Hubli Highway Closed : कागल ते हुबळी महामार्ग बंद, कोल्हापूर आयजी रंजनकुमार शर्मा यांनी सांगितला पर्यायी मार्ग; शेतकरी संघटनांची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT