नाशिक

सेवा हमी देणाऱ्या विभागांनी प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करावा

CD
(पान १ ला ॲंकर) फोटो: NSK26H31657 नंदुरबार : बैठकीत बोलताना चित्रा कुलकर्णी. शेजारी अश्‍विनी सानप, नमन गोयल. -------------- जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करावा चित्रा कुलकर्णी यांच्या प्रशासकीय विभागांना सूचना सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ७ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवा संबंधित प्रशासकीय विभागांनी विहित कालावधीत नागरिकांना सेवा देऊन प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करावा, असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. ७) महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत आयुक्त चित्रा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलिस अधीक्षक अश्‍विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, राज्य लोकसेवा हक्क आयोग कार्यालयाचे उपसचिव मिलिंद निकम, महाआयटी जिल्हाव्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयेश खैरनार आदी अधिकारी उपस्थित होते. श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, नागरिकांना अधिसूचित सेवा विहीत कालावधीमध्ये उपलब्ध करुन द्याव्यात. सेवा हमी देणाऱ्या विभागांनी प्रलंबित प्रकरणाचा त्वरित निपटारा करावा, अधिकाऱ्यांनी अर्जांची व अपिलांची नियमित पडताळणी करावी, अपिलांचा विहीत कालावधीत निपटारा करावा, पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी विहित वेळेत सेवा द्यावी, सेवा नाकारतांना लेखी आदेश काढावेत, सेवा ऑनलाइन उपलब्ध करुन द्याव्यात, प्रथम व द्वितीय अपीलधारकांनी वेळेचे बंधन पाळावे, आपले सेवा पोर्टलवरील सेवेची माहिती प्रत्येक विभागानी घ्यावी, जिल्ह्याचा सिटीझन स्कोअर वाढविण्यासाठी फिडबॅक घेवून त्यावर उपाययोजना कराव्यात, लोकामध्ये फिडबॅकसाठी जनजागृती करावी, सर्व विभागानी जिल्ह्याचे मानांकन वाढविण्यासाठी प्रयत्न सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. अपर जिल्हाधिकारी श्री. गोगटे म्हणाले, सर्व विभागानी आपले मानांकन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती संघवी यांनी सांगितले, जिल्ह्यातील सर्व विभागाची लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत निकाली अर्ज, अपिले व प्रलंबित अर्जाची माहिती सादरीकरणाद्वारे मांडली. अक्कलकुवा तालुक्याचा आढावा अक्कलकुवा तालुक्याची स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, राज्य लोकसेवा हक्क आयोग कार्यालयाचे उपसचिव मिलिंद निकम, तहसीलदार विनायक घुमरे, गटविकास अधिकारी विजय अहिरे, तालुका कृषी अधिकारी एस. सी. नामदास, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सोमनाथ पवार, महाआयटीचे जिल्हा व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयेश खैरनार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती पश्चिम बंगाल सरकारचे सल्लागार म्हणून नियुक्त; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल

Pune News : चारा टंचाईआधीच पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’; पीक अवशेष जाळण्याऐवजी साठवणूक, प्रक्रिया आणि पोषणमूल्यवर्धनावर भर

Ramdas Athawale on Gyanesh Kumar : 'ज्ञानेश कुमार काहीही झाले तरी राजीनामा देणार नाहीत'; अभिजीत दीपकेंच्या आंदोलनावर रामदास आठवले स्पष्टच बोलले, दिला कडक इशारा

Pune News : खेळाच्या मैदानावरील अनधिकृत इमारत महापालिकेच्या बांधकाम विभागाने केली जमीनदोस्त

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी ४८ उमेदवार रिंगणात; ९ ऑक्टोबरला माघारीची अंतिम मुदत

SCROLL FOR NEXT