सिंहस्थाच्या कामांवर मुख्यमंत्र्यांचा ‘वॉच’
संथ कामांमुळे फडणवीस रविवारी थेट मैदानात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : सिंहस्थ कुंभमेळ्याचा अधिकृत प्रारंभ मानला जाणारा ध्वजारोहण सोहळा ३१ ऑक्टोबरला होणार असून, त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याला अवघे तीन आठवडे शिल्लक असताना गोदाकाठावरील कामांची गती संथ असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारीत थेट लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (ता. ११) त्यांच्या नाशिक दौऱ्यात कामांचा आढावा घेतला जाणार आहे.
२०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने ३५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. नाशिक महापालिकेमार्फत सुमारे पाच हजार कोटींची कामे सुरू आहेत. मात्र, भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीला अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने सिंहस्थाच्या कामांवर थेट देखरेख ठेवण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून, तेथून दररोज कामांचा आढावा घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पहिली शाही पर्वणी ३१ ऑगस्ट २०२७ ला होणार आहे. त्यासाठी अवघे अकरा महिने शिल्लक असल्याने ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची धावपळ वाढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी विविध यंत्रणांकडून कामांच्या सादरीकरणाची तयारी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.