नाशिक

महसूल मंत्रीमहसूल मंत्री

CD
टुडेपान १ : मेन फिचर ------------- NSK26H31317 जळगाव : जिल्हा नियोजन भवनात नागरिकांच्या समस्या जाणून घेताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. सोबत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ आदी. ------- मुख्यालय सोडल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन महसूलमंत्री बावनकुळे : सावकार, वाळू वाहतुकीवर पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना कारवाइचे आदेश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : राज्यात दुष्काळाचे संकट असताना मुख्यमंत्री आणि मंत्री शेताच्या बांधावर जाऊन आढावा घेत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी संबंधित गावांमध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश देण्यात आले असून, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच अवैध सावकारी आणि वाळू वाहतुकीविरुद्ध कडक कारवाईच्या सूचना दिल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री बावनकुळे आज जिल्ह्यात आले होते. आढावा बैठकीनंतर ते माहिती देत होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रेाहन घुगे आदी यावेळी उपस्थित होते. ‘डीपीडीसी’चा निधी दुष्काळासाठी जिल्हा नियोजन समितीचा पाचशे कोटींचा निधी यंदा दुष्काळावर खर्च केला जाणार आहे. यंदा सिमेंट रस्ते तयार करणार नाही. वीजतारा चोऱ्यांवर ‘एमपीडीए’ जळगाव जिल्ह्यात वारंवार विजेचे ट्रान्स्फॉर्मर, वीजतारा चोरीचे प्रमाण वाढले आहे. तीन, चार वेळा गुन्हे दाखल होऊनही चोरी थांबत नाही. यामुळे शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे अशा वीज चोरांवर एमपीडीए’अंतर्गत मोका लावण्याच्या कारवाइचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ----------- चौकट सावकारांवरही कारवाईचे आदेश जिल्ह्यातील एरंडोल, रावेर, यावल तालुक्यात सावकारापासून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना मोठा त्रास होत आहे. सावकार नागरिकांना अडचणीत आणण्याची कामे करीत आहेत. सावकारांविरुद्ध ४० ते ४० निवेदन मला आज नागरिकांनी दिली आहेत. यामुळे अवैध सावकारांचा बंदोबस्त करण्याचेही आदेश दिले आहेत. अवैध वाळू वाहतुकीचाही बंदोबस्त करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. चारा वाटप करणार दोन महिना पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. चारा टंचाई भासू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व गामपंचायतींना चारा पिकविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत चारा पिकवेल, तिच शेतकऱ्यांना वाटप करेल. यामुळे चाराटंचाई होणार नाही. रब्बीतही तेच पिके घेण्याचे नियोजन आहे. ------- चौकट शेतकरी, मजुरांना रोजगार गावागावांत शेतमजुरांना, ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करण्याबाबत सूचित केले आहे. यामुळे दुष्काळातही मजुरांना गावातच रोजगार मिळेल. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT