नाशिक

दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना

CD
पान एक -------------- दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल; योजनेत मोठा बदल सकाळ वृत्तसेवा नंदूरबार, ता. १५ : राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने सन २०२६-२७ या वर्षासाठी ''मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेंतर्गत'' राबविण्यात येणाऱ्या वैरण उत्पादन कार्यक्रमातील चारा बियाणे व ठोंबे वाटपाच्या अटी व शर्ती शिथिल करण्यात आल्या आहे. या निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी मोठी मदत होणार आहे. हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक लाभार्थ्याकडे स्वतःचे किमान तीन ते चार पशुधन असणे आवश्यक होते. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ही अट २०२६-२७ या वर्षापुरती शिथिल करण्यात आली आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांना १ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर ४ हजार रुपये किमतीचे, तर शेतकरी समूह गटांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर २० हजार रुपये किमतीचे चारा बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ वर्षातून केवळ एकदा घेता येत होता. सुधारित निर्णयानुसार, पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यास पात्र लाभार्थी व शेतकरी गटांना वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा बियाण्यांचा लाभ घेता येईल. -------- पाण्याची उपलब्धता प्रमाणित करणे बंधनकारक एकापेक्षा अधिक वेळा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकरी किंवा शेतकरी समूह गटाकडे चारा उत्पादनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध असल्याची खातरजमा करून संबंधित उपायुक्त (पशुसंवर्धन) यांनी ते प्रमाणित करणे आवश्यक राहील. ही विशेष सवलत फक्त २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षासाठीच लागू राहणार आहे. --- पालकमंत्री यांचे आवाहन दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, स्थानिक पातळीवर उत्पादन वाढविणे आणि शेतकरी बांधवांना दिलासा देणे या उद्देशाने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

Latest Marathi News Update: ‘मकोका’तील फरार आरोपीला आंध्र प्रदेशातून अटक

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

SCROLL FOR NEXT