नाशिक

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर

CD
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर नंदुरबार जिल्ह्यातील १,३४३ शेतकऱ्यांचा समावेश नंदुरबार, ता. १३ : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची यादी जाहीर करण्यात आली असून, यात नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार ३४३ पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. बँकांनी योजनेच्या पोर्टलवर एकूण २८ हजार ३७२ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने संगणकीय प्रक्रियेद्वारे २४ जुलैला १७ हजार ९९८ शेतकऱ्यांची पहिली यादी, ११ सप्टेंबरला एक हजार ३४५ शेतकऱ्यांची दुसरी यादी आणि १२ ऑक्टोबरला एक हजार ३४३ शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. आतापर्यंत एकूण २० हजार ६८६ शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी यादी संबंधित बॅंक शाखा, विकास संस्था, तसेच ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेतील पात्र शेतकऱ्यांची कर्जबाकी ३१ मार्चला स्थितीनुसार निश्चित करण्यात आली आहे. १ एप्रिलनंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्चला कर्जथकबाकी दोन लाखांपेक्षा अधिक असली तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्ज निरंक करण्यात येणार आहे. मृत, वयोवृद्ध, तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने १९ ऑगस्टला मानक कार्यप्रणाली निर्गमित केली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत तपासून विहित प्रक्रिया पूर्ण करावी व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

SCROLL FOR NEXT