NVL26B01144
नवलनगर : फुटबॉल खेळातील राष्ट्रीय विजेत्या खेळाडू वंशिका शिंदे, चांदणी गिरी यांच्यासोबत प्राचार्य अपर्णा पाटील, एम. एम. येवलेकर, एस. पी. देवरे, ए. ए. पाटील.
---------
‘जिजामाता’च्या खेळाडूंची फुटबॉलमध्ये बाजी
वंशिका शिंदे, चांदणी गिरी यांचा महाराष्ट्राच्या विजयी संघात समावेश
सकाळ वृत्तसेवा
नवलनगर, ता. ३० : गोवा स्टुडंट गेम्स फेडरेशनतर्फे गोव्यात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. या संघात श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील वंशिका मनोहर शिंदे (आठवी) आणि चांदणी सुनील गिरी (नववी) या विद्यार्थिनींचा समावेश होता.
प्राचार्य अपर्णा विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही विद्यार्थिनींची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. संघाचे मार्गदर्शक व क्रीडा प्रशिक्षक मोहशिम शेख यांनी त्यांना विविध डावपेच, मैदानी कौशल्ये आणि सातत्यपूर्ण सरावाचे मार्गदर्शन केले. शालेय स्तरावर एम. एम. येवलेकर, एस. पी. देवरे आणि अभिजित अशोक पाटील, उपमुख्याध्यापक जे. जी. बागूल, पर्यवेक्षक पी. एस. देसले यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन कुणाल पाटील, अश्विनी पाटील, युवानेते रायबा पाटील, प्राचार्य अपर्णा पाटील यांनी दोन्ही खेळाडूंसह प्रशिक्षक मोहशिम शेख यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.