नाशिक

धुळ्याच्या मुलींची कामगिरी

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 34113 धुळे : राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातील येथील खेळाडू यशश्री पाटील, कनक सूर्यवंशी, रुची पाटील, पलक पाटील, वंशिका शिंदे, चांदणी गिरी. -- राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा विजय -- धुळ्याच्या सहा मुलींची लक्षवेधी कामगिरी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : गोवा येथे पार पडलेल्या १० व्या राज्य स्टुडंट गेम्स फेडरेशनच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या १६ वर्षांखालील मुलींच्या संघाने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे. या विजयात शहरातील सहा होतकरू खेळाडूंनी मोलाची कामगिरी केली असून, कामगिरीने राज्याचे लक्ष वेधून घेतले. २२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या चार दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून विविध राज्यांचे संघ सहभागी झाले होते. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने हैदराबाद आणि बृहन्मुंबईच्या संघांवर मात करीत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात यजमान गोवा संघाचा पराभव करत महाराष्ट्राच्या मुलींनी उत्कृष्ट सांघिक खेळ, दमदार बचाव आणि आक्रमक चालींच्या जोरावर विजेतेपद आपल्या नावावर केले. सिस्टेल शाळेची विद्यार्थिनी यशश्री चंद्रकांत पाटील हिने संघाचे नेतृत्व केले. या संघात नॉर्थ पॉईंट शाळेची विद्यार्थिनी कनक गणेश सूर्यवंशी, रुची दीपक पाटील, पलक पाटील तसेच जिजामाता कन्या हायस्कूलमधील वंशिका शिंदे आणि चांदणी गिरी यांचा सहभाग होता. क्रीडा प्रशिक्षक मोहसीन शेख यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजयी संघ धुळ्यात परतल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. या यशाबद्दल माजी आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील, रायबा पाटील, प्राचार्य जे. आर. नेल्सन आदीनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Tax: पेट्रोल-डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय! 31 ऑक्टोबरपासून डिझेलवरील टॅक्स वाढवला; पेट्रोल-डिझेल आता कितीला?

ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ! ८ वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून वॉरंट जारी

Viral Bears: ४ अस्वलांचा पिकअपमध्ये धुमाकूळ! स्नॅक्स अन् बिअरचे कॅन पळवले! VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Marathi News Live Updates : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात १२ व्या आरोपीला बेड्या; हरियाणामधून अटक केलेल्या अमरला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी

'क्रिकेटशी मस्ती नाही...', आचरेकर सरांची तीन महत्त्वाची वाक्य कोणती? अमोल मुजुमदारांचा खुलासा; हरमनप्रीतला म्हटलं Best Captain

SCROLL FOR NEXT