sneakbite.jpeg 
नाशिक

खरं की काय! सर्पदंशात महाराष्ट्र अव्वल..तर महाराष्ट्रात 'हा' जिल्हा टॉपला..!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संशोधकांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सरकारी डेटाचा वापर सर्पदंश आणि त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणांचा अंदाज घेण्यासाठी केला.या अभ्यासात आढळून आले की, जागतिक सर्पदंशाच्या निम्मे मृत्यू भारतात झाले आहेत. त्यांच्या संशोधनानुसार, २०१७-१८ मध्ये महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमध्ये ३२.२ लोकांना सर्पदंश झाला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे ३६.६ लोक, तर तामिळनाडूमध्ये ३६.६ आणि गोवा ३४.५ आढळले

अन् नाशिकचा नंबर टॉपमध्ये...तर देशात दुसरा
जिल्हानिहाय माहिती काढल्यास देशात नाशिक जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वाधिक सर्पदंशाची प्रकरणं नाशिक जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. धारवाडच्या जेएसएस आर्थिक संशोधन संस्थेच्या प्रदीप एस साळवे, श्रीकांत वतावती आणि ज्योती हल्लाद यांनी एलसेव्हियर या शैक्षणिक जर्नलमध्ये हा डेटा प्रकाशित केला होता. यासाठी आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीचा डेटा वापरुन जिल्हास्तरीय विश्लेषण करण्यात आलं. ज्यामध्ये संपूर्ण देशभरात महाराष्ट्र सर्पदंशात आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात २०१८-१९ मध्ये जवळपास ४२ हजारांहून अधिक सर्पदंश झाल्याचं आढळून आलं. तर त्यापाठोपाठ पश्चिम बंगालचा दुसरा क्रमांक लागतो. बंगालमध्ये ३६ हजार ८५८ सर्पदंश झाल्याची माहिती आहे. 

यामुळे नाशिकमध्ये साप जास्त...

भौगोलिक स्थिती पाहिली तर नाशिक घाटात पसरलेला पश्चिम घाट आणि द्राक्ष शेती, साखर कारखाने आणि वाईनरीज वेगवेगळ्या जातींच्या सापांचे अस्तित्व वाढविण्यास अनुकूल परिस्थिती देतात, असे या अभ्यासात म्हटलं आहे. पालघरसारख्या जिल्ह्यांमध्ये ३ हजार २०४, ठाणे २ हजार ६५५, कोल्हापूर २ हजार २९८, पुणे २ हजार १०९, रत्नागिरी १ हजार ९९४ आणि जळगाव १ हजार ८४२ सर्पदंशाची प्रकरणे २०१८-१९ मध्ये नोंद झाली आहेत. 

दोन वर्षात राज्यात चौदा जिल्ह्यांमध्ये सर्पदंश होण्याचे प्रमाण जास्त
२०१७-१८ मध्ये महाराष्ट्रात ३८ हजार ९०४ जणांना सर्पदंश झाला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ३४ हजार २३९ लोकांना सर्पदंश झाला. २०१८-१९ मध्ये महाराष्ट्रात सर्पदंशाचे प्रमाण वाढले असून दर एक लाख लोकसंख्येमध्ये 35 लोक सर्पदंश आणि पश्चिम बंगालमध्ये ३९.४ लोकांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्पदंशाशी संबंधित मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Muncipal : महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा; समन्वय ठेवा, नाराजांची समजूत काढा – रविंद्र चव्हाण

Ashes Series : २६२ धावा, २० विकेट्स! AUS vs ENG चौथ्या कसोटीत गोलंदाजांची हवा, स्टीव्ह स्मिथचा 'झापूक झूपूक' चेंडूवर दांडा गुल Video

College Student Accident: जिवलग मैत्रिणी रोजचा गाडीवरचा प्रवास, पण आजचा दिवस असा येईल वाटलं नव्हतं... भीषण अपघातात दोघींनाही मृत्यूने गाठले

Thane Crime: मानवतेला काळीमा फासणारी घटना! ७ दिवसांचं बाळ ६ लाखांत सौदा अन्...; बालतस्करीचे भयंकर वास्तव समोर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मागील ३ दिवसांपासून भाजपकडून युतीची चर्चा नाही

SCROLL FOR NEXT