एन्कर
-----------------
सरकते जिने, लिफ्टमध्ये मोबाईल वापरास बंदी
नवीन नियमावली; दरमहा देखभाल, वार्षिक लेखापरीक्षण बंधनकारक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने उद्वाहने (लिफ्ट), सरकते जिन्यांसाठी नव्याने नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार महिन्यातून किमान एकदा मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडून देखभाल व तपासणी करून रोज वहीत नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वर्षातून एकदा लेखापरीक्षण व चाचणी तर १८ वर्षांखालील व्यक्तीस लिफ्ट चालक म्हणून नेमण्यास बंदी घातली आहे. १२ वर्षांखालील मुलांना प्रौढ व्यक्तीशिवाय लिफ्ट, एस्कलेटर वापरता येणार नाही, लिफ्टमध्ये प्रवेश करताना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
राज्यात लिफ्ट कोसळणे, सरकत्या जिन्यांचे अपघात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नियमांनुसार लिफ्ट, एस्कलेटर आणि मूव्हिंग वॉक बसविणे, चालविणे, देखभाल आणि तपासणीसाठी प्रक्रिया निश्चित केली आहे. लिफ्ट उभारणी व परिरक्षणासाठी विद्युत कंत्राटदाराला स्वतंत्र अनुज्ञप्ती घ्यावी लागेल, त्यासाठी कार्यालय, १०० चौरस मीटर कार्यशाळा, १५ एच.पी. वीज जोडणी, पात्र अभियंते, पर्यवेक्षक, उभारणी पथक, चोवीस तास कॉल सेवा आणि पाच लाख रुपयांपर्यंत ऐपत प्रमाणपत्र या अटी घालण्यात आल्या आहेत. लिफ्ट अनुज्ञप्ती २० वर्षांसाठी वैध तर नूतनीकरण पाच वर्षांसाठी करण्यात आले आहे. या नियमांमुळे लिफ्ट, एस्कलेटरच्या सुरक्षिततेसाठी मालक, कंत्राटदार आणि प्रशासन यांची जबाबदारी स्पष्ट करण्यात आली आहे.
------------चौकट
अशी आहे नियमावली
- लिफ्ट बसविण्यापूर्वी विद्युत निरीक्षकाकडे अर्ज.
- एक वर्षासाठी परवानगी वैध.
- लिफ्ट वाहनात सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक.
- जुन्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही, स्वयंचलित बचाव साधन एक वर्षाच्या बसविणे.
- अपघात झाल्यास २४ तासांच्या आत विद्युत निरीक्षक व स्थानिक पोलीस ठाण्याला अहवाल.
- तृतीय पक्ष विमा अनिवार्य.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.