Maharashtra Meditates Fight against Corona sakal
नाशिक

महाराष्ट्र मेडिटेट्सद्वारे कोरोनाविरुद्ध लढा

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे आजपासून सातदिवसीय शिबिर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या महाराष्ट्र विभागातर्फे ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत सोमवार (ता. २४)पासून ३० जानेवारीपर्यंत ऑनलाइन प्राणायाम ध्यान शिबिर होणार आहे.(Fight against Corona)

या उपक्रमाच्‍या माध्यमातून माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांसह सर्व भारतीयांना घरबसल्या सात दिवस विनामूल्य प्राणायाम ध्यान शिबिरात सहभागी होण्याची संधी आहे. भारतीय जवानांनी देशासाठी गाजविलेले शौर्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाच्या कथा ‘शौर्यगाथा’मधून सांगितल्या जाणार आहेत. ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’मध्ये देशातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रित केले आहे. यात कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन सौरभ कालिया यांचे वडील एन. जे. कालिया, जम्मू-काश्मीरमधील अतिरेकीविरोधी लढ्यातील शहीद मेजर मयांक वैष्णोई यांच्या पत्नी स्वाती वैष्णोई, कारगिल युद्धात शहीद होण्यापूर्वी भारतीय इतिहासातील सर्वांत कठीण अशा पर्वतीय युद्धात नेतृत्व केलेले शहीद कप्तान विक्रम बात्रा यांचे आई-वडील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून ‘शौर्यगाथा’ सांगणार आहेत.

ध्यान शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागरिकांचे मानसिक स्थिरता, मनःशांती लाभावी, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढावी, यासाठी विनामूल्य ऑनलाइन शिबिर होणार आहे. शिबिर सर्वांसाठी खुले असून, यात सहभागी होण्यासाठी https://aolmh.in/Maharashtra-Meditates या संकेतस्‍थळावर नावनोंदणी करावी लागणार आहे.

गेल्या वर्षी दोन लाख नागरिक सहभागी

गेल्‍या वर्षी २०२१ पासून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंगकडून मोफत प्राणायाम ध्यान शिबिर होत आहे. ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’च्या पहिल्या टप्प्यात सुमारे दोन लाख नागरिक प्राणायाम ध्यान शिबिरात सहभागी झाले होते. कोविडमुळे निर्माण झालेली भीती आणि चिंता कमी झाल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

शौर्य, त्यागास देणार अनोखी मानवंदना

आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्टेट टीचर कोऑर्डिनेटर राहुल पाटील म्हणाले, की देशाच्या संरक्षणासाठी अनेक सैनिक तरुण वयात कुटुंबीय व नातेवाइकांपासून दूर राहिले. त्यांच्या शौर्यास व त्यागास मानवंदना देण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे विनामूल्य प्राणायाम ध्यान शिबिर होणार आहे. महाराष्ट्रातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी, तसेच अन्य नागरिकांनी ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ या सत्रात सहभागी व्हावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT