नाशिक

जुनी पेन्शनसाठी शनिवारी आंदोलन

CD
जुनी पेन्शनसाठी शनिवारी आंदोलन --- शाळांसह कार्यालयांमध्ये निषेध नोंदविण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. २८ : राज्यात १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचारी, अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली. या निर्णयाला ३१ ऑक्टोबरला २१ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे शुक्रवारी (ता. ३१) जिल्हाभर काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविण्यात येणार आहे. डीसीपीएस, एनपीएस, यूपीएस आणि आरएनपीएस यासारख्या योजनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्याला पुरेसा आधार नसल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे. या योजना रद्द करून महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम १९८२, निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम १९८४ आणि भविष्य निर्वाह निधीसह जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गेल्या ११ वर्षांपासून या मागणीसाठी संघर्ष करीत आहे. मागणीच्या अंतिम टप्प्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. या आंदोलनाची पूर्वसूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदनाद्वारे देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या शाळा व कार्यालयांत काळ्या फिती लावून कामकाज करावे आणि आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, जिल्हा सरचिटणीस विपिन पाटील, राज्य पदाधिकारी विनायक चौथे, संजय सोनार तसेच जिल्हा पदाधिकारी राकेश पाटील, कल्पेश चौधरी, नाना पाटील, सचिन चव्हाण, दीपक गिरासे, प्रशांत बाविस्कर यांच्यासह संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT