नाशिक

मुक्त विद्यापीठातर्फे वक्तृत्व, चित्रकलासह रांगोळी स्पर्धा

CD
मुक्त विद्यापीठातर्फे वक्तृत्व, चित्रकलासह रांगोळी स्पर्धा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘विकसित भारत २०४७ सेवा संकल्प उपक्रमा’अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, चित्रकला आणि रांगोळी या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तिन्ही स्पर्धा ऑनलाइन होणार असून, विद्यार्थ्यांनी रविवार (ता. ११) पर्यंत प्रवेशिका ईमेलद्वारे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘माझा विकसित भारत २०४७’, ‘आत्मनिर्भर भारत’, ‘डिजिटल भारत’, ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘कौशल्य भारत’ हे विषय आहेत. यापैकी एका विषयावर पाच मिनिटांचा स्पष्ट चेहरा व आवाज असलेला व्हिडिओ पाठवावा लागेल. चित्रकला स्पर्धेसाठी ‘डिजिटल भारत २०४७’, ‘हरित भारत २०४७’, ‘नारी शक्ती २०४७’, ‘सर्वांसाठी आरोग्य २०४७’, ‘सर्वांसाठी घर २०४७’ आणि ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ हे विषय आहेत. चित्र ए-३ आकारात काढून त्याचे स्पष्ट छायाचित्र पाठवणे आवश्यक आहे. रांगोळी स्पर्धेसाठी ‘माझा भारत २०४७’, ‘जल जीवन’, ‘नारी शक्ती’, ‘कौशल्य भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘सबका साथ, सबका विकास’ हे विषय असून, रांगोळी २.५ बाय २.५ फूट आकाराची असावी. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच उत्तेजनार्थ विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रे देण्यात येतील. स्पर्धकांनी कलाकृतीचा व्हिडिओ किंवा छायाचित्र, कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन), संपूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांकासह paikrao_vk@ycmou.digitaluniversity.ac या ईमेलवर प्रवेशिका पाठवाव्यात, असे सेवा संकल्प उपक्रम समितीचे सदस्य-सचिव प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

MP OBC Reservation : मोठी बातमी! मध्य प्रदेशात 27 टक्के OBC आरक्षणाला उच्च न्यायालयाचा नकार; 14 टक्के आरक्षण कायम, रखडलेल्या 13 टक्के जागा भरण्याचेही निर्देश

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

SCROLL FOR NEXT