Police Recruitment  esakal
नाशिक

Maharashtra Police Recruitment: 'त्या’ उमेदवारांना मिळणार मैदानी चाचणीची संधी! पोलीस महासंचालकाचे आदेश; उमेदवारांनी साधावा संपर्क

Nashik News : राज्यभरात पोलीस भरतीची तयारी करणार्या युवकांनी एकापेक्षा अधिक जिल्ह्यात विविध पदांसाठी अर्ज केला असल्याने त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी येण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Recruitment : महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पोलिस शिपाई पदांसाठी बुधवारपासून (ता. १९) मैदानी चाचणींना प्रारंभ होत आहे. राज्यभरात पोलीस भरतीची तयारी करणार्या युवकांनी एकापेक्षा अधिक जिल्ह्यात विविध पदांसाठी अर्ज केला असल्याने त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी येण्याची शक्यता आहे.

अशावेळी सदर उमेदवारांने एकाठिकाणी संपर्क साधून सदरची माहिती दिल्यास त्यास चार दिवसांनंतरची तारीख मैदानी चाचणीसाठी देण्याचे आदेश राज्याचे प्रशिक्षण विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना मैदानी चाचणी देता येणार आहे. (Candidates applied for more different categories get chance for field test)

महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पोलिस शिपाई, चालक, बँडस्‌मन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई या पदांसाठीची भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणींना बुधवारपासून प्रारंभ होत आहे. राज्यभरातील उमेदवारांनी यातील एकाच घयकात किंवा वेगवेगळ्या घटकांत एकापेक्षा अधिक अर्ज केलेले आहेत. यामुळे, मैदानी चाचणी एकाच दिवशी व सलग दोन दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, उमेदवारांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांची अशी गैरसोय व अडचण होऊ नये यासाठी अपर पोलीस महासंचालकांनी अशा उमेदवारांना त्याने दिलेल्या अर्जाच्या ठिकाणी मैदानी चाचणी देता यावी यासाठी नव्याने आदेश जारी केलेले आहेत. त्यानुसार, पहिल्या तारखेच्या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी हजर झालेल्या उमेदवारास दुसर्या चाचणीसाठी दुसरी तारीख दिली जाणार आहे. (latest marathi news)

या मैदानी चाचणीच्या तारखेत चार दिवसांच अंतर असावे, असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे. त्यासाठी उमेदवाराला मैदानी चाचणीवेळी लेखी पुरावे सादर करावे लागणार आहेत. यासंदर्भात उमेदवारांना काही अडचणी वा शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर मेल करावा असेही आवाहन करण्यात आलेले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT