नाशिक

महिलांच्या एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डाची सक्ती रद्द करा ! माजी आमदार संजय चव्हाण यांची मागणी

CD
परिवहन महामंडळाने स्मार्ट कार्डाची सक्ती करु नये ः चव्हाण सकाळ वृत्तसेवा अंबासन, ता. ३१ : महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याची योजना सुरू केली. मात्र, १ ऑक्टोबर २०२६ पासून या सवलतीचा लाभ घेण्यासाठी (एनसीएमसी) स्मार्ट कार्ड बंधनकारक केल्याने ग्रामीण, अशिक्षित आणि वृद्ध महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही सक्ती तातडीने रद्द करावी किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी आमदार संजय चव्हाण यांनी केली आहे. यापूर्वी ओळखपत्राच्या आधारे महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत मिळत होती. मात्र, नवीन नियमानुसार स्मार्ट कार्ड काढण्यासाठी २५० रुपये, कार्ड ॲक्टिव्हेट करण्यासाठी ३० रुपये आणि १०० रुपयांचा टॉप-अप, असा एकूण ३५० रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठीच महिलांना आर्थिक भार सहन करावा लागत असल्याची टीका चव्हाण यांनी केली. काही एसटी बसमधील इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनवर (ईटीएम) सर्व्हर डाऊन असल्याने किंवा तांत्रिक अडचणींमुळे कार्ड स्कॅन होत नाही. अशा वेळी कार्ड असूनही महिलांना पूर्ण तिकीट काढावे लागते. परिणामी, प्रवासी महिला आणि वाहक यांच्यात वाद होऊन दोघांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

IND vs NZ, 5th T20I: सिफर्टच्या ९३ धावा अन् फिलिप्सने मोडला विलियम्सनचा रेकॉर्ड; न्यूझीलंडने मॅच जिंकली, पण मालिका भारताच्या खिशात

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Latest Marathi News Update : रावेरच्या चार भावंडांच्या हत्येचा तपास; IPS कुमार चिंता यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

SCROLL FOR NEXT