नाशिक

बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा

CD
NSK26H34530 जळगाव : राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झालेल्‍या खेळाडूंसमवेत बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी. ––– राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्हा संघात १२ खेळाडू सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे सांगली येथे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याची निवड झाली आहे. यात बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावतर्फे रविवारी (ता.४) जिल्हास्तरीय निवड चाचणी बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातून १२ खेळाडूंची राज्‍य संघात निवड झाली आहे. जिल्‍हास्‍तरीय निवड चाचणी स्पर्धेतून महिला व पुरुष गटातील एकूण १२ खेळाडूंची जळगाव जिल्हा संघात निवड करण्यात आली. महिला गटात ६५ ते ७० किलो वजन गटात आयूशी भोसले, ४५ ते ४८ किलो वजन गटात हर्षा सपकाळे, ५१ ते ५४ किलो वजन गटात संध्या मोरे, ५७ ते ६० किलो वजन गटात दिशा पाटील आणि ७० ते ७५ किलो वजन गटात श्रुती सोनावे यांची निवड झाली. तर पुरुष गटातून ५० ते ५४ किलो वजन गटात प्रथमेश नरवाडे, ६५ ते ७० किलो वजन गटात गौरव बारसे, ७० ते ७५ किलो वजन गटात नागेश खरारे, ७० ते ८० किलो वजन गटात गौरव बहारे, ८० ते ८५ किलो वजन गटात आशुतोष गौतम, ८५ ते ९० किलो वजन गटात भावेश ठाकूर आणि ९१ किलोपेक्षा अधिक वजन गटात लोकेश देवकर यांची निवड करण्यात आली. निवड चाचणी स्पर्धेत पंच म्हणून पवन शिरसाठ, संतोष सुरवाडे, अलिशानाज शेख, विनीत सुरवाडे, भूषण पाटील आणि जैयद पटेल यांनी काम पाहिले. यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या यूथ अँड एज ग्रुप कमिशनचे चेअरमन नीलेश बाविस्कर, बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र मोरे, उपाध्यक्ष धनराज कसाट, सचिव चुणीलाल गुप्ता, विशाल बाविस्कर, दीपक वाल्डे, डॉ. शरूख पिंजारी तसेच राष्ट्रीय बॉक्सर रोहित पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahua Moitra: 'सीजेपीला विदेशातून नव्हे, तर भाजपकडूनच फंडींग!' भाजपच्या आरोपांवर महुआ मोइत्रांचा 'गुगली'?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याला नवे नेतृत्व! राजवर्धन शिंदे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी; संग्राम सोरटे उपाध्यक्ष

Latest Marathi News Live Update : "स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही"; माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा स्पष्ट कायदेशीर सल्ला

Ajit Jogi IAS to Chief Minister : राजीव गांधींच्या एका फोन कॉलवर IAS नोकरी सोडून राजकारणात प्रवेश करणारे अजित जोगी पुढे कसे बनले काँग्रेसचे सर्वात मोठे बंडखोर?

नाहीतर ते आज जिवंत असते... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या 'त्या' दोन गोष्टी, कसा झालेला त्यांचा मृत्यू?

SCROLL FOR NEXT