Google Max with dog handlers
Google Max with dog handlers esakal
नाशिक

Maharashtra State Police Melava: नाशिकच्या ‘गुगल’, ‘मॅक्स’चा पुन्हा डंका! आयुक्तालयास मिळवून दिली चॅम्पियनशिप

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra State Police Melava : पुण्यात सुरू असलेल्या राज्यस्तरीय पोलीस दलातील श्वानांच्या कर्तव्य स्पर्धेमध्ये नाशिकच्या मॅक्स आणि गुगल या श्वानांनी अफलातून कामगिरी नोंदवित नाशिक पोलीस  आयुक्तालयासाठी चॅम्पियनशिप पटकावली आहे.

विशेषत: मॅक्स याने अंमली पदार्थ स्पर्धेत सुवर्ण तर, गुगल याने गुन्हेशोध स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. (Maharashtra State Police duty Melava Nashik Google Max won again police Commissionerate won championship)

पुण्यात रामटेकडी येथे राज्यस्तरीय पोलीस दलातील श्वानांसाठीच्या १८ व्या महाराष्ट राज्य पोलीस कर्तव्य मेळावा गेल्या सोमवारपासून (ता. ४) सुरू आहेत.

या स्पर्धेचा पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज (ता. ९) समारोप झाला.  आठवडाभर रंगलेल्या या स्पर्धेसाठी राज्यभरातील पोलीस दलातील ५० श्वान सहभागी झाले होते.

या स्पर्धेतील विविध काठिण्य प्रक्रियेच्या स्पर्धांमध्ये  नाशिकच्या गुगल आणि मॅक्स या दोन्ही श्वानांनी आपल्या कामगिरीची छाप सोडली. विशेषत: गुगलवर सर्वांनीच कौतुकाचा वर्षावच केला.

पोलिस दलातील श्वानांसाठी अत्यंत क्लीष्ठ अशी स्पर्धा असते ती गुन्हे शोध गटाची. यात गुगलने अत्यंत कठीण असा क्राईम सीनचा यशस्वीरित्या छडा लावला. यामुळे गुगल यास त्या गटाचे रौप्य पदक पटकावले.

तर, मॅक्स याने अंमली पदार्थ गटामध्ये तरबेज कामगिरीची नोंद केल्याने त्यास सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. गुगल आणि मॅक्स यांच्या उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर नाशिक पोलीस आयुक्तालयास स्पर्धेचे अंजिक्यपद बहाल करण्यात आले.

त्यांच्या या कामगिरीचा पोलीस महासंचालक रजनीश सेठ, नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी कौतूक केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डॉग हॅण्डलरचा गौरव

राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात नाशिकचे गुगल व मॅक्सचे हस्तक गणेश कोंडे, अरुण चव्हाण, विलास पवार, सुधीर देसाई यांनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली. तर त्यांना पोलीस निरीक्षक इरफान शेख, शंकर खटके यांचे मार्गदर्शन लाभले. या सार्यांचे मेळाव्यात गौरव करण्यात आला.

गुन्हेशोधात तरबेज ‘गुगल’

डॉबरमॅन जातीचा असलेल्या पाच वर्षीय गुगलने स्पर्धेमध्ये अव्वल कामगिरी नोंदविली आहे. गुन्हेशोधाचे कर्तव्य बजाविताना गुगलने आत्तापर्यंत ३५ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. गुन्हा घडल्यानंतर मार्ग दाखविण्यात गुगल तरबेज आहे.

जर्मनशेफर्ड ‘मॅक्स’

जर्मनशेफर्ड जातीचा मॅक्स सहा वर्षांचा आहे. अंमली पदार्थ शोधक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या मॅक्सने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी नोंदवित सुवर्ण पदक पटकावले. मॅक्सने आत्तापर्यंत अनेक गुन्ह्यांमध्ये कर्तव्य बजावले आहे.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, किशोरसुधारालय, रेल्वे स्थानक, बसस्थानक याठिकाणी नियमितपणे मॅक्सकडून अंमली पदार्थांचा शोध घेतला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT