धुळे टुडे १ साठी...
---
धुळे, साक्री, नंदुरबारच्या
तांत्रिक विद्यालयांचे नामकरण
---
शासन निर्णय जारी; विद्यालयांना आता नवी ओळख
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : राज्यातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने २१ ऑक्टोबरला यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यानुसार धुळे, साक्री आणि नंदुरबार येथील शासकीय तांत्रिक विद्यालयांना नवीन नावे देण्यात येणार आहेत.
धुळे येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नाव आता वैद्य प्र. ता. जोशी शासकीय तांत्रिक विद्यालय, धुळे असे असेल. साक्री येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाला नानासाहेब पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. तर नंदुरबार येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नामकरण बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता शासकीय तांत्रिक विद्यालय, नंदुरबार असे करण्यात आले आहे. या निर्णयानुसार धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील तांत्रिक शिक्षण संस्थांच्या नावांमध्ये बदल होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना नामकरणासंदर्भातील पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण १६२ शासकीय तांत्रिक विद्यालये कार्यरत असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि माध्यमिक स्तरावर कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे, या उद्देशाने ही विद्यालये महत्त्वाची भूमिका बजावतात. नव्या नामकरणामुळे संबंधित संस्थांची ओळख बदलणार असून, शासन निर्णयानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.