नाशिक

दिवाळी अंक अग्रलेख - केल्याने देशाटन...

CD
केल्याने देशाटन... केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार ही आर्या किंवा सुभाषित कवी मोरोपंत यांचे. त्याचा ढोबळमानाने अर्थ असा ः देशाटनाने अनुभवाची शिदोरी लाभते. प्रवासाने विद्वान, पंडित यांच्यासह बहुआयामी अशा व्यक्तिमत्त्वांचा परिचय, वार्तालाप होतो. चारचौघांत वावरावे, बोलावे, वागावे कसे याचा अनुभव मिळतो. धार्मिक, शास्त्रांच्या ग्रंथांच्या वाचनातून माणसाच्या बुद्धिमध्ये, चातुर्यात भर पडते. थोडक्यात पर्यटन हे माणसाचे जगणे, अनुभव आणि आयुष्य समृद्ध करते. त्याच्या अनुभवविश्‍वाला, भावविश्‍वाला, बौद्धिकतेला विकसित आणि उन्नत करते. देशाटन, भटकंती, भ्रमंती, दुर्ग-किल्ल्यांना भेटी, वस्तुसंग्रहालयांपासून विविध राज्ये, देशांना भेटीतून तेथील समाजजीवनाचा, अर्थकारणाचा, संस्कृतीचा, आचारविचारांचा परिचय होत असतो. त्यातून वाढीला लागलेल्या देवाणघेवाणीतून मानवी व्यवहार अधिक व्यापक, संपन्न आणि एकमेकांचे जगणे सुखकर आणि अनुभवसंपन्न करणारे ठरते. अर्थकारणाला गती आणि हाताला रोजगार मिळतो. पर्यटनाकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे. त्याच्या माध्यमातून विकासाची आणि अर्थकारणाची चाके गतिमान व्हावीत. जगात पर्यटनाचा उद्योग ११.६ ट्रिलियन डॉलर एवढा अवाढव्य आहे. त्यात भारताचा वाटा २६३ अब्ज डॉलरचा. जगाच्या जीडीपीमध्ये त्याचा वाटा ९.८ टक्के. या व्यवसायामध्ये अमेरिका (२.६३ ट्रिलियन डॉलर), चीन (१.७५ ट्रिलियन डॉलर), जर्मनी (५६६ अब्ज डॉलर) आघाडीवर आहेत. भारतानेही जागतिक पर्यटनात स्वतःचे अस्तित्व निर्माण केलेले असले, त्यातून अर्थकारणाला आणि पर्यटकसंख्यावाढीला प्रोत्साहन दिलेले असले तरी त्यासाठी आणखी ठोस, नियोजनबद्ध, दूरदर्शी पावले उचलली पाहिजेत. देशात उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल यांच्याखालोखाल महाराष्ट्रात परकी पर्यटक येत असले तरी त्यांचा महाराष्ट्रभर वावर वाढावा, त्यांनी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना भेटी द्याव्यात, त्यासाठी त्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू कसे वाढीला लागतील, यासाठी प्रयत्नांची गरज आहे. देशांतर्गत पर्यटकांमध्येही उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा, केरळ, पश्‍चिम बंगाल ही राज्ये आघाडीवर आहेत. त्यामुळेच देशाच्या आणि जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचे अस्तित्व अधिक उठावदार व्हावे. कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यापासून ते विदर्भातील जंगलसफारीपर्यंत, विलोभनीय सह्याद्रीतील गड-किल्ल्यांपासून ते सातपुड्याच्या पर्वतरांगांतील रमणीय स्थळांपर्यंत या सगळ्यांची पर्यटनाच्या नकाशावरील ओळख अधिक प्रभावी केली पाहिजे. वाढत्या मेडिकल-वेलनेस टुरिझम, विविध प्रकारच्या पर्यटन सर्किटच्या माध्यमातून राज्यासह देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारी स्थळे विकसित करणे, त्याकरता घराबाहेर पडणाऱ्यांना दर्जेदार, स्पर्धात्मक सोयीसुविधा, सेवा पुरवणे, स्वच्छता, आल्हाददायक वातावरण राखणे, कायदा-सुव्यवस्थेची हमी देणे अशा महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे. तीर्थक्षेत्रांच्या विकासाबरोबरच मनोरंजन, साहसी पर्यटन, जंगल सफारीसह थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक कसे येतील, हे पाहावे लागेल. या उद्योगात वेळेवर परिणामकारक सेवा, कल्पक पद्धतीने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याने लाखो पर्यटक महाराष्ट्रात येतील. ते नाशिक, त्र्यंबकेश्‍वरनंतर राज्याच्या कान्याकोपऱ्यात अधिकाधिक संख्येने कसे जातील, त्यांच्या आकर्षणाची स्थळांचे त्यादृष्टीने प्रमोशन कसे केले जाईल, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्याला केंद्र सरकारने प्रोत्साहन आणि सहकार्य करावे. तरच पर्यटनातून हाताला काम आणि अर्थकारणाला चालना मिळेल. ......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Beed News: बीड नगर परिषदेच्या सभेत रणकंदन! महिला नगरसेविकांच्या अवमानाचा आरोप; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Neha Bora: मंदिरातील अत्याचाराच्या वक्तव्यावरुन भाजपचा नेहा बोरांवर जोरदार हल्ला; काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जाहीर केली नाराजी

Crime News: यूपीतील भाजप नेत्याच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल! व्हिडिओमध्ये कोणावर केले आरोप? 'माझ्या मृत्युला पत्नी...'

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील ४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT