नाशिक

आंदोआंदोलन मागेआंदोलन मागेलन मागे

CD
32862 जळगावः अन्न व औषध प्रशाासन मंत्री निरहरी झिरवाळ यांच्योसाबत बैठक झाल्यानंतर माहिती देताना प्रतिभा शिंदे, सचिन धांडे. शेजारी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके आदी. ------ मंत्रीमंडळाच्या बैठकीत आदिवीसींचे मागण्या सोडविणार मंत्री झिरवाळ ; पाच दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : वनपट्टेधारकांच्या प्रलंबित मागण्या जिल्हा प्रशाासन स्तरावर सोडविण्याचे तर राज्य स्तरावरील मागण्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सोडविण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशाासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. यामुळे मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषण शनिवारी (ता.१७) मागे घेण्यात आले. अशी माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी दिली. शनिवारी लोकसंघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्षा शिंदे व पदाधिकाऱ्यांसोबत सायंकाळी मंत्री झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक उइके, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीत झालेल्या चर्चेतबाबत माहिती देताना शिंदे यांनी सांगितले, की जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हयात नेमके किती वनदावे आहेत. किती पूर्णता, किती अंशता मंजूर आहेत याची माहिती मिळावी, वन दाव्याचा प्रश्न सोडविण्यााठी एक कालबध्द कार्यक्रम जळगावमध्ये राबविण्यात यावा, आणी तो राज्यभर राबवावा असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मंत्री मंडळाच्या बैठकीतच न्याय मिळेल. त्यासाठी ते मुद्दे कबिनेट मध्ये मांडण्याचे आश्वासन मंत्री झिरवाळ यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच ११ नोव्हेंबर २०१६ नूसार दोन पुरावे ग्राहय धरावेत किंवा नेमके काय पुरावे मागवेत यासाठी सुधारणा करावी याबाबत कबिनेटने निर्णय घ्यावा, आदीवासी बांधंवानाही शेतकरी मानण्यात यावे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत कबिनेटमध्ये विषय; मांडला असे आश्वासन दिले आहे. आदीवासी बांधवांच्या शेत जमीनीवर वन विभागाचे नाव येते ते लागू नये यासाठी योग्य; निर्णय घ्यावा याबाबतही कबिनेटमध्ये निर्णय घेतला जाणार आहे. सर्वच मागण्यांचा शाासन स्तरावर, जिल्हा स्तरावर पाठपुराव्ययाचे आश्वासन दिल्याने आम्ही समाधानी आहोत, यामुळे आम्ही उपोषण मागे घेत असल्याची माहिती अध्यक्षा शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT