नाशिक

जिल्‍हा परिषद कर्मचारी समायोजन

CD
आकृतीबंधातील अतिरिक्‍त २८ कर्मचाऱ्यांचे समायोजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या सुधारित आकृतीबंधामुळे काही पदे अतिरिक्त ठरली आहेत. या अतिरिक्‍त ठरलेल्‍या कर्मचाऱ्यांना इतर विभागात सामावून घेण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. त्‍यानुसार जिल्‍हा परिषदेत आज झालेल्‍या प्रक्रियेत २८ कर्मचाऱ्यांचे समुपदेशनाद्वारे समायोजन केले. राज्‍य शासनाच्‍या महिला व बालविकास विभागाच्‍या सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आला होता. यामुळे राज्‍यभरातच महिला व बालविकास विभागातील कर्मचाऱ्यांची संख्‍या कमी होत आहे. यामुळे विभागातील काही कर्मचारी अतिरिक्‍त ठरत आहेत. त्‍यानुसार जळगाव जिल्‍हा परिषदेच्‍या महिला व बालविकास विभागातील २८ कर्मचारी अतिरिक्‍त ठरले होते. या सर्व कर्मचार्यांना इतर विभागातील रिक्‍त असलेल्‍या पदांवर पदस्‍थापना देण्यात आली आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या सामान्‍य प्रशासन विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्‍या उपस्थितीत समुपदेशनाद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्‍ये कनिष्ठ सहाय्यक १६, विस्तार अधिकारी सांख्यिकी २, वरिष्ठ सहाय्यक लेखा ९ व शिपाई १ अशा २८ कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात आले आहे. चौकट महिनाभराच्‍या पगाराचा प्रश्‍न रखडलेला दरम्‍यान, आकृतिबंधात अतिरिक्‍त ठरल्‍याने या कर्मचाऱ्यांना मागील महिन्‍याचा पगार देखील मिळालेला नाही. आता अन्‍य विभागात पदस्‍थापना मिळाली असली तरी मागील महिन्‍याचा रखडलेला पगाराचा प्रश्‍न अद्याप कायम आहे. हा पगार कधी मिळणार याबाबत शासन स्‍तरावर निर्णय झाल्‍यानंतरच कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : हवामानात अचानक मोठा उलटफेर! ३० हून अधिक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

Latest Marathi News Live Update: दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

SCROLL FOR NEXT