नाशिक

दोंडाईचा.. मालपूर येथे महात्मा गांधीजीच्या जयंतीनिमित्त ग्रामसभा

CD
DO126B04347 मालपूर (ता. शिंदखेडा) : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ग्रामसभेत इतिवृत्ताबाबत माहिती देताना राजेंद्र चौधरी. शेजारी उपस्थित बापू बागूल. ----------- शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी मालपूरच्या ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी; रस्त्यांच्या प्रश्‍नावरही आवाज सकाळ वृत्तसेवा दोंडाईचा, ता. ३ : सप्तश्रृंगी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यावर मुरुम टाकावा. पथदिवे लावावेत. दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गटारी तुंबलेल्या आहेत त्या वाहत्या कराव्यात. ‘ट्रिगर वन’मध्ये शिंदखेडा तालुका घेतला असताना पंचनामा कशासाठी केला जात आहे. शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी. एक लाख रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मालपूर (ता. शिंदखेडा) येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलिसपाटील बापू बागूल होते. ग्रामसभेचे सचिव म्हणून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी यांनी कामकाज चालविले. त्यावेळी ग्रामस्थांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. या वेळी मंडल कृषी अधिकारी अक्षय गवांदे, सहायक कृषी अधिकारी प्रशांत बागल, ग्राममहसूल अधिकारी नारायण माजडकर, माजी सरपंच लक्ष्मण पानपाटील, माजी उपसरपंच तुकाराम माळी, रवींद्र राजपूत, वैद्यकीय अधिकारी डॉ. नारसिंग पावरा, मुख्याध्यापक एस. एस. भलकार, श्रीराम अहिरे, भटु रावल, राधा पावरा, अंगणवाडी, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते. या वेळी मंडल कृषी अधिकारी अक्षय गवांदे यांनी ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत महिला शेतकरी सक्षमीकरणाबाबत माहिती दिली. शेतीशी संबंधित असणाऱ्या व्यवसाय असलेल्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. आतापर्यंत गावातील ३१३ अर्ज प्राप्त आहेत. त्यांना प्रमाणपत्र वितरीत केले जातील. कृषी विम्याबाबत माहिती दिली. महिला शेतकरी पोर्टलवर जाऊन फॉर्म भरून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ग्राम महसूल अधिकारी नारायण माजडकर यांनी सांगितले, की शेतावर जाऊन पंचनामा करावयाचे आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेचे खाते, फार्मर आयडी द्यावेत. पीक पाहणी करून घ्यावी. एकूण १६७९ शेती प्लॉट आहेत. त्यापैकी आतापर्यंत एक हजार ३३३ शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी पिकाची नोंदणी करावी. फळबाग लागवड योजना व अन्य योजनांचा लाभ व्हीबीजी रामजी योजनेत घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. पावरा यांनी ‘माझे गाव- आरोग्यसंपन्न गाव’ मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. राधा पावरा यांनी ‘टीबीमुक्त भारत’ची शपथ दिली.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT