नाशिक

गांधी, लालबहाद्दूर शास्‍त्री जयंती

CD
NSK26H31173 जळगाव : बीयूएन रायसोनी स्कूलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्‍त वेगवेगळ्या वेशभुषेत सहभागी विद्यार्थी –––– NSK26H31174 ला. ना. विद्यालयात स्‍वच्‍छता मोहिम राबविताना शिक्षक व कर्मचारी. –––– NSK26H31192 इकरा शाहीन उर्दू स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात महात्‍मा गांधीच्‍या वेशभुषेत विद्यार्थीसह शिक्षक –––– महात्‍मा गांधी, लालबहाद्दूर शास्‍त्रींना अभिवादन (उपशीर्षक) शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम; स्‍वच्‍छता अभियानाला प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : राष्ट्रपिता महात्‍मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहाद्दूर शास्‍त्री यांच्‍या जयंतीनिमित्त शहरातील विविध शाळा, संस्‍था व महाविद्यालयांमध्‍ये कार्यक्रम झाला. महात्‍मा गांधी व लालबहाद्दूर शास्‍त्री यांच्‍या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले. तर गांधी जयंतीनिमित्त स्‍वच्‍छता अभियान राबविण्यात आले. तसेच अहिंसेची शपथ देखील देण्यात आली. रायसोनी स्‍कूल प्रेमनगरमधील बीयूएन रायसोनी स्कूलमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची यानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या वेशभूषा साकारून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली. ला. ना. विद्यालय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त सेवा संकल्प अभियान अंतर्गत अहिंसा शांती सद्‌भावना यात्रा, महापुरुष जयंती कार्यक्रम व स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविण्यात आला. सुरवातीला गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित अहिंसा शांती सद्‌भावना यात्रेत शाळेतील एनसीसी पथक व मार्गदर्शक शिक्षक श्रीकांत घुगे सहभागी झाले होते. मुख्‍याध्‍यापक सचिन देशपांडे यांच्‍या शिक्षक व महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी जय सोनवणे, कुणाल साखरे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सेवा संकल्प अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत संपूर्ण शालेय वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोग शाळा, शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला. जिल्‍हा सत्र न्‍यायालय जिल्हा व सत्र न्यायालय जळगाव येथे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एस. व्ही. खोंगल, जिल्हा न्यायाधीश-६ आर. एस. साळगांवकर, मुख्य न्यायदंडाधिकारी आर. टी. घोगले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन. एस. बुद्रुक, सहावे सहदिवाणी न्यायाधीश एम. एन. जयस्वाल, सातवे सह दिवाणी न्यायाधीश एस. एम. चव्हाण, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दर्शन देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र गवई, सचिव आशिष ए. पाटील आदी उपस्थित होते. इकरा शाहीन उर्दू स्कूल ''इकरा शाहीन उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज''मध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि राष्ट्रसेवा यांविषयीच्या गांधीजींच्या विचारांचे सादरीकरण केले. पाचवीमधील विद्यार्थी मेजर मुस्तकीम पिंजारी याने महात्मा गांधींची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधले. गांधीजींच्या वेशभूषेत त्याने व्यक्तिमत्त्व आणि विचार जिवंत केले. काशिनाथ पलोड स्कूल विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले.सरस्वती पूजनानंतर प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या वेशभूषेत सहभागी झाले. रिद्धी शर्मा, समृद्धी दिवाण व विधी खडके यांनी त्यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. विद्यार्थ्यांना सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि देशभक्ती या मूल्यांची ओळख करून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT