नाशिक

महात्मा गांधी जयंती कार्यक्रम

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. मेन -- फोटो क्रमांक : 31239 वलवाडी (ता. धुळे) : विद्याधन महाविद्यालय येथे महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त प्रतिमपूजनवेळी उपस्थित डॉ. संजीव गिरासे. शेजारी डॉ. के. बी. पाटील, हर्षल पाटील, प्रा. डॉ. जागृती पाटील आदी. -- फोटो क्रमांक : 31240 दोंडाईचा : महात्मा गांधी जयंतीनिमित्त हस्ती स्कूलच्या ४९ व्या महाराष्ट्र बटालियन एनसीसी व स्काऊट गाईड छात्रसैनिकांतर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी विद्यार्थी. -- प्रबोधनात्मक उपक्रमांनी महापुरुषांना अभिवादन -- विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग; महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छतेचा जागर सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शहर व जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींच्या वतीने प्रबोधनात्मक व सामाजिक उपक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच शालेय परिसर स्वच्छ करत श्रमदानाचा संदेश दिला. याशिवाय ऑनलाइन प्रश्नमंजूषा, वक्तृत्व स्पर्धा, शपथविधी आणि महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले. या दोन्ही महान राष्ट्रपुरुषांचे विचार तरुण पिढीच्या आचरणात उतराव्यात, या उद्देशाने झालेल्या या उपक्रमांना प्रतिसाद मिळाला. ---------- हस्ती ग्रुप स्कूल दोंडाईचास्थित हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे विद्यार्थी व हस्ती पब्लिक स्कूलच्या ४९ व्या महाराष्ट्र बटालियन एनसीसी व स्काऊट गाईड छात्रसैनिकांतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्य कार्यालय काराणी ज्ञानदीप येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन स्काऊट गाईड छात्रा आर्या सोनार व एनसीसी छात्र सैनिक प्रियांशी जाधव यांच्या हस्ते झाले. प्राचार्या रझिया दाऊदी, प्राचार्य जीवन सपकाळे, मुख्याध्यापक सदाशिव महाजन, प्रशासकीय अधिकारी रेखा गाडेकर, प्राचार्या पूनम पाटील, स्मिता साठे, समन्वयक महेश डिगराळे, समिना बोहरी, मंगलसिंग राजपूत, ज्योती बोरसे, स्वाती देवरे व नरेश सावंत उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी दोंडाईचा बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. या कार्यक्रमाला स्टेशन मास्टर शाम भाटी, स्टेशन अधीक्षक विक्रम चौधरी, उपअधीक्षक नंदलाल बारी व बसस्थानक नियंत्रक व्ही. डब्ल्यू. साबरे यांचे सहकार्य झाले. - विसपुते माध्यमिक विद्यालय आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपुते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी झाली. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमापूजन झाले. एस. आर. पाटील, डी. डी. पवार, ए. के. पाटील व एस. बी. भदाणे उपस्थित होते. उपशिक्षक अविनाश पाटील यांनी निर्मित केलेल्या शैक्षणिक व्हिडिओ व ऑनलाइन टेस्टद्वारे ‘ऑनलाइन प्रश्नमंजूषा’ घेण्यात आली. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शालेय परिसरात स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविला गेला. विजय देसले, अपर्णा पाटील, योगेंद्र पाटील, महेश पाटील, डॉ. जयेश गाळणकर, राजश्री मासुळे, तुषार कुलकर्णी, अभिज्ञ पवार, ललित शिंदे, विलास भामरे व महेश पवार यांनी संयोजन केले. संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विसपुते व सचिव स्मिता विसपुते यांनी उपक्रमाचे कौतुक केले. - पालेशा महाविद्यालय धुळे एज्युकेशन सोसायटीच्या मा. ध. पालेशा वाणिज्य, कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन व शपथविधी सोहळा पार पडला. प्राचार्य डॉ. प्रभाकर महाले अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. हेमंत जोशी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एम. एम. मून आणि प्रा. प्रशांत बडगुजर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. मून यांच्या मार्गदर्शनात उपस्थितांनी सत्य, अहिंसा व शांततेचा संकल्प केला. प्रा. रक्षंदा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. अंबिका जानकर यांनी आभार मानले. प्रा. हेमंत जैन, प्रा. राजेश उपासनी, प्रा. कुश शर्मा, प्रा. कुशल चौधरी, प्रा. सुषमा सबनीस, प्रा. विशाखा जाधव, प्रा. प्रियंका इंगळे, प्रा. वैभवी चौधरी, प्रा. कामिनी काचरे व प्रा. वैष्णवी हिंगमिरे आदी उपस्थित होते. - महिला महाविद्यालय प. खा. भ. मंडळ संचलित कला, वाणिज्य आणि बी.सी.ए. महिला महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने ‘स्वच्छता अभियान व पर्यावरण संवर्धन’ उपक्रम राबविण्यात आला. अध्यक्षा स्मिता अजमेरा यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य डॉ. डी. झेड. चौधरी यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम झाला. म्हणून प्रा. खांडारे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. उपरवट आणि एनसीसी विभागप्रमुख डॉ. वर्षा दाभाडे उपस्थित होते. विद्यार्थिनींनी श्रमदान करत स्वच्छ परिसर व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला. प्रा. वाल्हे यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. गिरासे, प्रा. सोनवणे आणि प्रा. पाटील यांनी संयोजन केले. - धुळे एज्युकेशन सोसायटी धुळे एज्युकेशन सोसायटीतर्फे शहरातील महात्मा गांधी पुतळ्यास संस्थेचे अध्यक्ष युवराज करनकाळ व मानद सचिव संतोष अग्रवाल यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. प्रतिमेचे पूजन ॲड. वैभव पुरोहित, जयंत शहा, अरुण अग्रवाल व किशोर बारी यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष करनकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. दिनेश रुद्र यांनी ‘वैष्णव जन तो…’ भजन सादर केले. मुख्याध्यापक एन. व्ही. नागरे यांनी प्रास्ताविक केले. व्ही. पी. सुळे, एम. आर. काकडे, व्ही. के. सोनवणे, एस. जी. दराडे, के. बी. पालवे यांनी रंगोली सजावट केली. एस. व्ही. डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. - सिन्धुरत्नज् एस.व्ही.सी. सिन्धुरत्नज् एस.व्ही.सी. (महात्माजी) इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी झाली. उपमुख्याध्यापिका शालिनी मंदान व पर्यवेक्षक चैतन्य भंडारी उपस्थित होते. विद्यार्थिनी सान्वी गुरव व माहि कुंभारे यांनी गीत सादर केले. विद्यार्थी शिवराज गावंडे, दर्शन पाटील, आयुष पवार व माहेश्वरी चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. तिसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेद्वारे गांधीजींचे तत्त्वज्ञान सादर केले. शिक्षिका पुजा पाटील व भाविका पंजाबी यांनी मार्गदर्शन केले. शर्वरी पाटोळे हिने सूत्रसंचालन केले. - सरस्वती नर्सिंग कॉलेज सरस्वती नर्सिंग कॉलेजमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. पूजा भामरे यांच्या अध्यक्षतेत व प्रा. डॉ. वैशाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रा. वैशाली पाटील यांनी गांधी विचारांचे महत्त्व विशद केले. प्राचार्य अवैस शेख, सविता पाटील, शोयेब अन्सारी, सारिका पावरा, प्रेरणा पवार, रविना पावरा व दीपिका पाडवी उपस्थित होते. तुषार सनेर यांनी सूत्रसंचालन केले. - विद्याधन महाविद्यालय शारदा शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे विद्याधन महाविद्यालय आणि साहित्य भारती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी विचार काळाची गरज’ या विषयावर विशेष व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांनी गांधी विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. के. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. संचालक हर्षल पाटील, प्रा. डॉ. जागृती पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा. पी. एफ. पाटील व प्रा. भगवान पाटील उपस्थित होते. प्रा. अतुल ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दीपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मंजुषा पवार, प्रा. ललिता निकम, प्रा. दीपक पाटील, प्रा. प्रथमेश शर्मा, आकाश उफाडे, सोनल पाटील, पूनम पाटील व सागर मासुळे यांनी संयोजन केले. - एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा (ता. धुळे) येथे अभय युवा कल्याण केंद्र संचलित एकनाथ महाराज हायस्कूल येथे सेवा संकल्प अभियानाअंतर्गत वक्तृत्व स्पर्धा झाली. मुख्याध्यापक के. पी. पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. ‘मेरे सपनों का भारत २०४७’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. सांस्कृतिकप्रमुख एस. आर. सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रल्हाद साळुंखे, सी. एस. भदाणे, मंगला देसले, नित्यानंद पवार, एस. पी. पावरा, शकील उस्मान व सुभाष शिंदे उपस्थित होते. - एसआरबी शाळा दहिवद (ता. शिरपूर) येथील सदाशिवशेठ आर. बाविस्कर इंटरनॅशनल शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी झाली. संस्थेच्या अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ. धीरज बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर, मुख्याध्यापक सुभाषनाथ पटले व पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका निवेदिता दुबे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले. - निमगूळ ग्रामपंचायत निमगूळ (ता. धुळे) ग्रामपंचायतीसमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दिलीप खिवसरा यांनी महापुरुषांच्या कार्याची माहिती दिली. शांताराम सूर्यवंशी, राजेंद्र नागपुरे, नवल महाजन, दत्तात्रय बोरसे, टिके पाटील, रामकृष्ण मोरे, संजय सोनवणे, सुदाम पाटील, सुभाष सोनवणे, भाऊसाहेब पवार, अभिमान महाजन, भिकन पाटील, शांताराम सोनवणे, प्रकाश सोनवणे, बापू मराठे व भास्कर सूर्यवंशी उपस्थित होते. - सिसोदे महाविद्यालय नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. एम. डी. सिसोदे उर्फ भाऊसाहेब कला, वाणिज्य व डॉ. सौ. उषताई प्रसादराव तनपुरे विज्ञान वरिष्ठ व श्रीमती आर. एम. सिसोदे कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, उपप्राचार्य पी. ए. आर. वसावे, उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे उपस्थित होते. या वेळी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. पी. निकम, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एम. सिसोदे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सारिका पाटील आदींनी संयोजन केले. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT