नाशिक

संशोधनासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींना मिळणार चालना जैन इरिगेशन- कृषी विद्यापीठात करार

CD
NSK26H31573 जळगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य कराराप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील आदी. ------ संशोधनासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींना मिळणार चालना उपशीर्षक महात्मा फुले कृषी विद्यापीठ- जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : संशोधन, शिक्षण, विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षमतांना चालना देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. अखिल भारतीय समन्वित जलसिंचन व पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे डॉ. अभय पाटील, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ. बाळकृष्ण, जळगावचे तीळ पैदासकार डॉ. सुरेंद्रसिंग राजपूत, जळगाव कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील उपस्थित होते. या करारांतर्गत आधुनिक सूक्ष्म सिंचन, सिंचनाचे स्वयंचलित प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काटेकोर सिंचन, सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर आणि भूपृष्ठाखालील ठिबक सिंचन या विषयांवर संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. विविध प्रमुख पिकांसाठी सिंचनाचे वेळापत्रक, पाण्याचा काटेकोर वापर, सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनासंबंधी पीकनिहाय प्रमाणित कार्यपद्धती विकसित करण्यात येतील. त्यात ड्रोनद्वारे फवारणी, इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयओटी सेन्सर्स आणि उपग्रह प्रतिमांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल. करारामुळे संशोधनास चालना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि संशोधनाच्या संधी देण्यावरही करारात भर दिला आहे. विद्यापीठातील कृषी व कृषी अभियांत्रिकी शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये आणि संशोधन प्रक्षेत्रांवर प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीचीही संधी कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणाऱ्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT