Chitrarath in the procession taken out on the occasion of Mahatma Phule jayanti esakal
नाशिक

Mahatma Phule Jayanti: भव्य शोभायात्रेने महात्मा फुलेंना अभिवादन; देखावे पालखीसह ढोलताशांचा गजर

सकाळ वृत्तसेवा

Mahatma Phule Jayanti : क्रांतिसूर्य, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जुन्या नाशिकमधील चौक मंडई येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मिरवणुकीतील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या बग्गीतील जिवंत देखाव्यांसह सहभागी चौदा चित्ररथांनी लक्ष वेधून घेतले.

रात्री उशिरा गणेशवाडी येथील महात्मा फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याजवळ शोभायात्रेचा समारोप झाला. अवकाळी पावसाच्या व्यत्ययानंतरही कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. (Mahatma Phule Jayanti Saluting Phule with grand procession sound of drums with palanquins nashik news)

स्त्री शिक्षणाचे अग्रणी, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेपाच वाजता चौक मंडई परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला.

याचवेळी जोरदार पावसाला सुरवात झाली. भर पावसातही शोभायात्रेत सहभागींचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता. तत्पूर्वी चौक मंडई भागातील महालक्ष्मी चाळ येथे माजी खासदार समीर भुजबळ, शेफाली भुजबळ, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी उपमहापौर प्रथमेश गिते, आयोजन समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे,

कार्याध्यक्ष शशी हिरवे, महिला शाखेच्या अध्यक्षा तेजश्री काठे, गजानन शेलार, रंजन ठाकरे, रामसिंग बावरी, वत्सला खैरे आदींच्या उपस्थितीत शोभायात्रेस प्रारंभ झाला. योगेश कमोद यांनी सूत्रसंचालन केले.

तत्पूर्वी मान्यवरांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. महालक्ष्मी चाळीपासून निघालेली शोभायात्रा चौक मंडई, वाकडी बारव, महात्मा फुले मंडई, दूध बाजार, बादशाही, लॉज, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, वीर सावरकर पथमार्गे गणेशवाडीतील महात्मा फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याजवळ शोभायात्रेचा समारोप झाला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

विविध चित्ररथांनी वेधले लक्ष

शोभायात्रेत विविध पंधरा चित्ररथ सहभागी झाले होते. यातील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई, संत सावतामाळी, गोंधळी आदी चित्ररथ लक्षवेधी ठरले. यात्रेच्या प्रारंभी असलेली पालखी, वारकरी संप्रदाय, आदिवासी नृत्यपथक, पारंपारिक ढोलपथक, विद्युत रोषणाई केलेल्या छत्रीधारी महिला विशेष लक्षवेधी ठरल्या.

शोभायात्रेचे ठिकठिकाणी विविध मंडळांतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. भर पावसातही सहभागींचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. ढोलताशांच्या दणदणाटाने यात्रेतील सहभागींत मोठा उत्साह होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT