नाशिक

थकीत कर्जप्रकरणी महावीर पतसंस्थेवर कारवाई होणार

CD
NSK26H32584 थकीत कर्जप्रकरणी महावीर पतसंस्थेवर कारवाई होणार उपशीर्षक संजय पवारांची माहिती; जिल्हा बँक संचालक मंडळ बैठकीत निर्णय सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : महावीर पतसंस्थेकडे थकीत असलेल्या सुमारे ३५ कोटी रुपयांच्या कर्ज व व्याजाच्या वसुलीसाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या १०० कोटी रुपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिली. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी (ता.१५) चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ज्येष्ठ संचालक प्रदीप देशमुख, माजी चेअरमन ॲड. रोहीणी खडसे, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, अनिल भाईदास पाटील, मेहताबसिंग नाईक, प्रताप हरी पाटील, विनोद पाटील, जयश्री महाजन, जनाबाई महाजन, घनशाम अग्रवाल, नाना राजमल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते. बैठकीनंतर अध्यक्ष श्री. पवार यांनी त्याबाबत माहिती दिली. महावीर पतसंस्थेकडे सन २००३ पर्यंतच्या कालावधीतील थकीत कर्ज ७ कोटी ९६ लाख व कर्जापोटी व्याज २७ कोटी १९ लाख असे एकूण ३५ कोटी थकबाकी आहे. त्यासाठी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. १४-२ चोपडा साखर कारखान्याचा १०० कोटी कर्जाचा प्रस्ताव दरम्यान, चोपडा सहकारी साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडे १०० कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने कारखान्याकडून क्रेडिट रेटिंग, व्हॅल्युएशन तसेच बारामती ॲग्रोसोबत झालेल्या कराराची कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच कर्ज प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या स्वमालकीच्या ५२ इमारतींचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम २५ ऑक्टोबरपूर्वी घेण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे चेअरमन संजय पवार यांनी सांगितले. ----- (चौकट) शेतकरी कर्जमाफीसाठी बँकेस २२३ कोटी प्राप्त शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्हा बँकेला २२३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या योजनेचा जिल्ह्यातील ४४ हजार शेतकरी सभासदांना लाभ मिळणार असल्याची माहिती संजय पवार यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा काढण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT