नाशिक

महावीरप्रसाद तापडिया यांचा आत्मीय सत्कार

CD
संक्षिप्त पट्टा ---- जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे तापडिया यांचा सत्कार जळगाव : जिल्हा माहेश्वरी सभा व श्री जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे सामाजिक कार्यकर्ते तथा सुप्रीम इंडस्ट्रीजचे संचालक महावीरप्रसाद तापडिया यांचा आत्मीय सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समितीतर्फे अध्यक्ष मनीष झवर, सचिव डॉ. जगदीश लढ्ढा, संजय दहाड व प्रदीप मणियार उपस्थित होते. जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे जिल्हाध्यक्ष तेजस देपुरा, जिल्हा सचिव अरुण लाहोटी, कार्याध्यक्ष वासुदेव बेहेडे, संघटन मंत्री सुनील मानुधने व विजय झवर, कोषाध्यक्ष सुनील बाहेती, उपाध्यक्ष अरविंद दहाड व योगेश कलंत्री, संयुक्त मंत्री विलास काबरा तसेच विलास करवा व डॉ. विश्वनाथ सोमाणी उपस्थित होते. ----- ‘उद्यमी’तर्फे १ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीप्रदर्शनाचे आयोजन जळगाव : येथील उद्यमी महिला नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेच्या सभागृहात शुक्रवार ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत दिवाळीनिमित्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. घरगुती व छोट्या स्वरूपात उद्योग - व्यवसाय करणाऱ्या महिला आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना पाठबळ मिळावे या उद्देशाने उद्यमी पतसंस्थेतर्फे दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. शुक्रवारी (ता.३०) सकाळी ११ वाजता महापौर दीपमाला काळे यांच्याहस्ते प्रदर्शनाचे होईल. ------- केळी काढणीला जिल्ह्यात गती जळगाव : जिल्ह्यात केळी काढणीला या आठवड्यात गती आली आहे. दर्जेदार केळी सध्या खानदेशात उपलब्ध आहे. जळगाव, चोपडा, जामनेर, यावल या भागात केळीची अधिक आवक होत आहे. रावेर, मुक्ताईनगर या भागांत आवक कमी आहे. ढगाळ वातावरण आहे. देशात वादळ येईल, असे सांगितले जात असून, जिल्ह्यात पावसाच्या भीतीने अनेक शेतकरी केळीची काढणी करून घेत आहेत. कारण पाऊस आल्यास शेतरस्ते खराब होतात. केळी शेतात खराब होण्याची भीती असते. यामुळे केळीची काढणी शेतकरी करून घेत आहेत. त्यात दरही कमी होतात. ----

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

Latest Marathi News Update: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे एसीबीच्या जाळ्यात

iPhone Duo Screen Issue: Apple iPhone Duoच्या स्क्रीनला तडे! कंपनीकडून रिप्लेसमेंट मिळणार का? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT