पान-३--ॲंकर--चित्र वापरणे
---------
थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची ‘अभय योजना’
-----------
थकबाकीवरील व्याज, विलंब आकार १०० टक्के माफ; मूळ रकमेतही २० टक्के सवलत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता.८ : दिवाळीच्या शुभपर्वावर वीजबिलांच्या थकबाकीतून ग्राहकांना मुक्त होण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि अन्य बिगरकृषी ग्राहकांसाठी ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी ६ नोव्हेंबरपासून १५ जानेवारी २०२७ पर्यंत होणार आहे. थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ केला जाणार असून, मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळणार आहे.
------------
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झालेल्या या योजनेचा प्रारंभ महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आला. ३१ मार्च २०२६ पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील बिगरकृषी ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि अन्य ग्राहकांचा यात समावेश आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनाही योजनेचा लाभ घेता येईल. कृषी ग्राहक आणि सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना मात्र यातून वगळण्यात आल्या आहेत.
१६-१
एकरकमीसाठी जास्त सूट
योजनेत मूळ थकबाकी एकरकमी किंवा हप्त्याने भरण्याची सुविधा आहे. १५ डिसेंबरपर्यंत एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना ‘अर्ली बर्ड रिबेट’ मिळणार आहे. तीन वर्षांपर्यंत वीजजोडणी खंडित असलेल्या लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना १० टक्के, तर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित असलेल्यांना २० टक्के सवलत मिळेल. अन्य लघुदाब आणि उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० आणि १५ टक्के सवलत दिली जाणार आहे.
१६-१
प्रीपेड मीटर घेतल्यास सवलत
लघुदाब ग्राहकांना ५० टक्के रक्कम आगाऊ भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांत भरण्याची सुविधा आहे. उच्चदाब ग्राहकांना थकबाकीनुसार तीन ते सहा व्याजमुक्त हप्ते उपलब्ध असतील. मंजूर भार २० किलोवॉटपर्यंत असलेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणीवेळी प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीत आणखी पाच टक्के सवलत मिळणार आहे. पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांचे सर्व्हिस कनेक्शन शुल्कही माफ करण्यात येणार आहे.
१६-१
ऑनलाइन अर्जप्रक्रिया
या योजनेसाठी अर्जप्रक्रिया ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा मोबाईल अॅपद्वारे अर्ज करता येणार आहे. थकबाकीमुक्त होण्यासाठी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.