नाशिक

महावितरणच्या २३ हजार पदांच्या भरतीची जाहिरात बनावट

CD
महावितरणची २३ हजार पद भरती जाहिरात बनावट सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. १६ : महावितरणमध्ये २३ हजारांहून अधिक विविध पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न घेता थेट भरती सुरू असल्याच्या जाहिराती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, या जाहिरात पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या असून त्यांचा महावितरणशी कोणताही संबंध नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या जाहिरातींमध्ये केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आणि हजारो रुपयांचे वेतन मिळणार असल्याचे आमिष दाखवले जात आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणमधील सर्व पदांच्या भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिराती आणि माहिती केवळ कंपनीच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाते. तसेच भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंकही याच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे सोशल मीडियावरून प्राप्त होणाऱ्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. कोणतीही जाहिरात किंवा भरतीची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासूनच खात्री करावी. बनावट जाहिरातींच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

Water Cut Decision : वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर; पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

Pune News : वॉर्डन पुरविण्याची कोंडी सुटली; आयुक्तांनी स्थगिती उठवली

SCROLL FOR NEXT