महावितरणची २३ हजार
पद भरती जाहिरात बनावट
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. १६ : महावितरणमध्ये २३ हजारांहून अधिक विविध पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न घेता थेट भरती सुरू असल्याच्या जाहिराती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, या जाहिरात पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या असून त्यांचा महावितरणशी कोणताही संबंध नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या जाहिरातींमध्ये केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आणि हजारो रुपयांचे वेतन मिळणार असल्याचे आमिष दाखवले जात आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणमधील सर्व पदांच्या भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिराती आणि माहिती केवळ कंपनीच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाते. तसेच भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंकही याच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे सोशल मीडियावरून प्राप्त होणाऱ्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. कोणतीही जाहिरात किंवा भरतीची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासूनच खात्री करावी. बनावट जाहिरातींच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.