Municipal employees removing the dangerous part of Vise Wada esakal
नाशिक

Nashik News: मेन रोड वीसे वाड्याची विसे वाड्याची भिंत कोसळली

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शूरवीर जिवाजी महाला जयंती मिरवणूक दाखल होण्याच्या अवघ्या काही तास अगोदर मिरवणूक मार्गावरील धुमाळ पॉइंट भागातील विसे वाड्याची भिंत कोसळण्याची घटना घडली.

सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. महापालिका पश्चिम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत वेळीच उर्वरित धोकादायक भाग उतरवून घेत मिरवणुकीसाठी रस्ता मोकळा करून दिला. (Main Road Vise Wada wall of Vise Wada collapsed Nashik News)

विसे वाड्याच्या भिंतीचा काही भाग सोमवारी (ता.९) सव्वापाचच्या सुमारास कोसळला. त्यानंतर साडेसहा वाजता पुन्हा भिंतीचा मोठा भाग कोसळला. यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली.

वाड्यास लागून असलेल्या काही व्यावसायिकांनी दुकाने बंद करून सुरक्षितस्थळी जाऊन थांबले. महापालिका पश्चिम विभागास माहिती मिळताच उपायुक्त तथा पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर, विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, बांधकाम विभागाचे प्रशांत बोरसे, उद्यान विभागाचे किरण बोडके तसेच अरुण मोरे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

संभाव्य धोका लक्षात घेता हायड्रोलिक ट्रॉलीचा वापर करून धोकादायक भाग उतरवून घेण्यात आला. सुमारे दोन तास काम सुरू असल्याने धुमाळ पॉइंट ते तिवारी लेनपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद होता.

व्यवसायिकांचे दुकानही बंद करण्यात आले होते. धोकादायक भाग उतरविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना वाड्याच्या मालकांकडून विरोध करण्यात आला. त्यांनी धोका लक्षात घेता विरोधाला न जुमानता धोकादायक भाग उतरवून घेतला.

नाभिक महामंडळाकडून शूरवीर जिवाजी महाला यांची जयंती मिरवणूक याच मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार होती.

मिरवणुक दाखल होण्याच्या अवघ्या काही तास अगोदर भिंत कोसळल्याने अनर्थ टळला. काही कारणास्तव मिरवणुकीस उशीर झाल्याने मिरवणूक दाखल होण्यास वेळ झाला. महापालिकेच्या तत्पर कामामुळे मिरवणुकीसाठी रास्ताही मोकळा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT