Police Team
Police Team esakal
नाशिक

Nashik Crime News : सातपूर गोळीबार प्रकरणात मुख्य संशयिताला अटक; संशयित-फिर्यादी सराईत गुन्हेगार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरामध्ये पूर्ववैमनस्यातून सिनेस्टाईल पाठलाग करीत संशयितांनी कारने धडक देत भरदिवसा गोळीबार केला. तसेच, कोयत्याने वार करून दोघांवर प्राणघातक हल्ला केला होता.

याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या पथकाने मुख्य सूत्रधारासह सहा संशयितांना जेरबंद केले आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सातपूर परिसरात दहशतीचे वातावरण होते. (Main suspect arrested in Satpur firing case Suspect Prosecutor experienced Criminal Nashik Crime News)

आशिष राजेंद्र जाधव (२८, रा. अमर रोहाऊस, शिवाजीनगर, सातपूर), भूषण किसन पवार (२६, रा. माऊली निवास, शिवाजीनगर, सातपूर), रोहित मंगलदास अहिरराव (२७, परफेक्ट हाईटस्‌, शिवाजीनगर, सातपूर), गणेश राजेंद्र जाधव (२६, रा. अमर रो हाऊस, शिवाजीनगर, सातपूर), किरण दत्तात्रय चव्हाण (२४, रा. उद्धव सोसायटी, शिवाजीनगर, सातपूर) व सोमनाथ झांजर उर्फ सनी (२२, रा. सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

शहर गुन्हेशाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषद घेत सदरील गुन्ह्यासंदर्भात माहिती दिली. गुन्ह्यातील मुख्य संशयित आशिष जाधव व फिर्यादी राहुल पवार हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यात भावांच्या खूनावरून पुर्ववैमन्यस होते.

यासह त्यांच्या सातत्याने कुरबूरीही होऊन वादाच खटके उडत होते. त्यातूनच, सुड उगविण्याच्या कारणातून संशयित आशिष जाधव व इतरांनी कट रचून राहुल पवार व तपन जाधव यांचा गेल्या १९ मार्च रोजी कारमधून पाठलाग केला. त्यात संशयितांनी त्यांची कार तपन जाधवच्या कारला धडक देत राहुल पवारवर गोळीबार केला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

परंतु त्याने पलायन केल्याने तो बचावला. तर, कारमधील तपन जाधव याला गोळी मारून त्याच्यावर कोयत्याने वार केले होते. त्यानंतर संशयितांनी एकाची दुचाकी घेऊन पसार झाले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात राहुल पवारच्या फिर्यादीनुसार प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा तपास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक करीत होते. तपन व राहुल यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा माग काढून संशयितांनी त्याची माहिती मुख्य संशयित आशिषला दिली होती. त्यानुसार सदरचा प्राणघातक हल्ला केल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. यानंतर संशयित पसार झाले होते.

मात्र गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करून संशयितांना नाशिक, धुळे शहरांमधून ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त वसंत मोरे, पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, अंमलदार रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझिम खान पठाण, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, महेश साळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT