Laborers harvesting maize after the rains took a break.
Laborers harvesting maize after the rains took a break. esakal
नाशिक

Agriculture News : परतीच्या पावसाच्या विश्रांतीमुळे मका काढणीला वेग

सकाळ वृत्तसेवा

नरकोळ : केरसाणेसह दसाणे, मुंगसे, पिंगळवाडे, परीसरात खरीप हंगामातील मका कापणीला वेग आला आहे. एकाच वेळी कापणी आल्याने मजुरांची तारांबळ उडाली आहे. परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सध्या सर्वत्र एकच धूम दिसत आहे. मका कापणी टेंडर पद्धतीने कामे सुरू आहेत. (Maize harvest speed up due to respite from return rains malegaon news)

सकाळपासूनच या कापणीला वेग येतो. सुरवातीला मजूर मका उभा असतानाच कणसे खुडणी करतात. कापणी करून चाऱ्याच्या सुतळीच्या सहाय्याने पेंढ्या बांधून एकत्र राहतात. त्यानंतर मका कणसाची वाहतूक होते. यंदा पावसाळा दमदार झाल्याने मका पिकाला वेळेवर पाणी मिळाले.

त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, असे मका उत्पादक नंदु अहिरे व दिलीप मोरे यांनी सांगितले. मकाला गेल्या आठवड्यात २००० ते २२०० रुपये क्विंटल दर होता. आता आवक वाढल्याने १५०० ते १५५० असा दर मिळत आहे. त्यामुळे मका उत्पादक काळजीत पडला आहे.

मका या पिकासाठी पेरणी, कोळपणी, निंदणी किंवा ताणनाशक फवारणी करणे, पाणी भरणे, कापणी व मशिनद्वारे दाणे काढणे आदी खर्च करावा लागतो. अचानक भाव घसरल्याने केलेला खर्च निघतो की नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT