नाशिक

मका खरेदीच्या आमिषाने शेतकऱ्यांना ९ लाख ५६ हजारांचा गंडा!

CD
पान एक ----------------- कळवणला मका खरेदीच्या आमिषाने शेतकऱ्यांना नऊ लाखाचा गंडा; गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा कळवण ता.१७ : शासकीय योजनेच्या माध्यमातून बियाणे, खते व कीटकनाशकांवर अनुदान मिळवून देण्यासह उत्पादित शेतमालाला हमीभाव देऊन खरेदी करण्याचे आमिष दाखवत मका उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ९ लाख ५६ हजार १०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार अभोणा परिसरात उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांकडून हजारो किलो मका खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. एवढेच नव्हे, तर पहिल्या हप्त्यापोटी दिलेला ९३ हजार ८०० रुपयांचा धनादेशही बँकेत वटला नसल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. याप्रकरणी वरखेडा येथील हिम्मत विष्णू पवार यांनी तक्रारीवरून ओ.एम.के. शेतकरी उद्योग समूहाचे अध्यक्ष सुनील बाबुराव कसाळे, कर्मचारी संगीता बोर्डे, किरण अर्णे, समाधान महाराज, अमोल चौधरी, श्याम वामन गावित, विदर्भ सीड कंपनीचे मॅनेजर स्वप्निल देशमुख, एरिया मॅनेजर सुजित झा आणि व्हिक्टोरिया मार्वेल सीड्स इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक गुलाम जिलानी खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पवार यांच्या तक्रारीनुसार ओ.एम.के. शेतकरी उद्योग समूहाच्या प्रतिनिधींनी परिसरातील शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध कृषी निविष्ठांवर अनुदान मिळवून देण्याबरोबरच उत्पादित मका हमीभावाने खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली. त्यानंतर शेतमाल विक्रीसाठी संबंधित समूहाच्या प्रतिनिधींशी कंपनीने संपर्क साधला. दोन टप्प्यांत १८ हजार किलोहून अधिक मक्याची खरेदी एप्रिल व मे २०२६ या कालावधीत विदर्भ सीड कंपनी आणि व्हिक्टोरिया मार्वेल सीड्स इंडिया प्रा. लि. यांच्या प्रतिनिधींमार्फत झाली. या मक्याची एकूण किंमत ९ लाख ५६ हजार १०० रुपये होती. शेतमाल विक्री केल्यानंतर मिळणाऱ्या पैशांची प्रतीक्षा सुरू झाली. सुरुवातीला पैसे लवकर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, वारंवार विचारणा करूनही संबंधितांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. ------- धनादेश न वटल्याने नुकसान शेतमालाचे पैसे मिळावेत यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित प्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर पहिल्या हप्त्यापोटी ९३ हजार ८०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. मात्र, हा धनादेश बँकेत जमा केल्यानंतर तो वटला नाही. त्यामुळे केवळ पैसे देण्यास टाळाटाळ होत नसून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय अधिक बळावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

SCROLL FOR NEXT