Majhi Shala Sundar Shala esakal
नाशिक

Nashik News: जिल्ह्यात 1 जानेवारीपासून ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान; शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव

राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये एक जानेवारी २०२४ पासून हे अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहे.

प्राथमिक विभागाने शाळांना पत्र काढले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली. (majhi shala sundar shala campaign from January 1 in district Education Officer Nitin Bachhao Nashik News)

राज्यातील शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

राज्यात सन २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना पूर्णतः राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे सदर योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

सद्य:स्थितीत 478 शाळांचा समावेश असलेला योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित आहे. ही योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येत आहे.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे २१ लाख, ११ लाख व ७ लाख रुपये इतक्या रकमेचे पारितोषिक देण्यात येतील. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर शाळांना अनुज्ञेय असेल.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून हे अभियान सुरु होणार आहे. पुढील ४५ दिवस म्हणजेच १५ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान चालणार आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन या ४५ दिवसात केले जाणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.

हा आहे अभियानाचा उद्देश

शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक, आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे.

क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे; कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, हे उद्देश या अभियानाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT