file photo esakal
नाशिक

Nashik News: माकडडोह तलावनिर्मितीस हिरवा कंदील! शेतीला होणार लाभ

तलावाची ४४ हजार दलघफू पाणी क्षमता वाढणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील जांबुटके धरण क्षेत्र परिसरात नवीन माकडडोह साठवण तलावास राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाने हिरवा कंदील दिला आहे. या साठवण तलावात ४४ हजार दलघफू पाण्याची साठवणूक होणार असल्याने हजारो हेक्टर क्षेत्रफळ ओलिताखाली येणार आहे.

या साठवण तलावाचे अंदाजपत्रक लवकरच राज्य शासनांकडे पाठविले जाणार असल्याने त्यास लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल, अशी माहिती चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. (Makdadoh lake construction green light Agriculture will benefit Nashik News)

तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जांबुटके धरण हे एकमेव धरण क्षेत्र आहे. धोडांबे, हट्टी, दह्याणे परिसरातील डोंगर परिसरात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. पावसाचे हे पाणी नदी नाल्याद्वारे जांबुटके धरणात येते.

परंतु धरणाची उंची, खोली व रुंदी कमी असल्याने हे धरण लवकर ओव्हरफ्लो होते. त्यामुळे धरणाची उंची, खोली व रुंदी वाढविण्याची मागणी नागरिकांनी आमदार डॉ. आहेर यांच्याकडे केली होती.

उंची वाढविल्यास धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली येत असल्याने त्यांनी धरणाची उंची वाढविण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा केली होती.

यातून जांबुटके धरणाच्या वरच्या बाजूने नवीन माकडडोह धरण बांधण्यास शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परंतु ही योजना गोदावरी खोऱ्यात येत असल्याने व गोदावरी हे अती तुटीचे खोरे असल्याने नवीन तलावास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास मृद व जलसंधारण विभागाची अडचण येत होती, तरीही डॉ. राहुल आहेर यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे थांबविले नाही.

राज्यातील युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली माकडडोह साठवण तलावास पुणे येथील मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता यांनी मंजुरी देत ४४ दलघफू पाणी उपलब्धता प्रमाणपत्र ५ जूनला मिळाल्याची माहिती आमदार डॉ राहुल आहेर यांनी दिली.

"जांबुटके धरण क्षेत्र परिसरात नवीन माकडडोह साठवण तलाव बांधण्यास गोदावरी खोऱ्याच्या मृद व जलसंधारण विभागाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित माकडडोह धरणाचा मार्ग मोकळा झाला आहे."

-डॉ. राहुल आहेर, आमदार, चांदवड-देवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT