Marigold File Photo esakal
नाशिक

Navratri Festival 2023: झेंडूचे हार, माळांच्या निर्मितीतून महिलांना रोजगार! नवरात्रोत्सवात झेंडूला अधिक पसंती

सकाळ वृत्तसेवा

Navratri Festival 2023 : रविवार (ता. १५) पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विविध फुलांसह हारांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. देवीला झेंडूची फुले अधिक प्रिय असल्याने इतर फुलांच्या तुलनेत झेंडूला अधिक पसंती मिळत आहे.

सहाजिकच झेंडूच्या फुलांपासून बनविलेल्या हारांना व माळांना अधिक मागणी आहे. त्यामुळे हार व माळांच्या निर्मितीतून हजारो महिलांना तात्पुरता का होईना रोजगार प्राप्त झाला आहे. (Making marigold garlands employment for women Marigolds more preferred during Navratri festival nashik)

नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. साहजिकच भगवतीला प्रिय असलेल्या झेंडूच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. देवीसह गटाला झेंडूच्या फुलांची माळ रोज घातली जाते. म्हणजे नऊ दिवस रोज एक माळ लागते.

घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. म्हणजेच केवळ घटासाठी रोज हजारो फुलांच्या माळांची गरज असते. याशिवाय कालिका देवी, विविध मंडळांनी जागोजाग तात्पुरत्या स्वरूपात स्थापना केलेल्या देवीलाही हार अर्पण केले जातात.

यात झेंडूच्या फुलांचे महत्त्व अधिक आहे. शहरातील अनेक फूल व्यावसायिकांकडून महिलांकडून फुलांचे हार व माळा तयार करण्याचे काम पुरविले जाते. यात पंचवटी भागातील अनेक कष्टकरी महिलांचा समावेश आहे.

छोट्या मखमल व झेंडूच्या फुलांच्या एका माळेसाठी एक रूपया मजुरी दिली जाते. दिवसाकाठी एक महिला क्षमेतेनुसार दोनशे ते तीनशे हार बनवितात.

म्हणजेच प्रत्येक महिलेला दिवसाकाठी दोनशे ते तीनशे रुपये मजुरी मिळते. विशेष म्हणजे हे काम घरपोच दिले जाते. त्यामुळे महिलांना कोठेही न जाता घरीच रोजगार प्राप्त झाला आहे.

प्रत्येकाचे स्वतंत्र दर

फुलांच्या आकारानुसार व हाराच्या लांबीनुसार हार बनविण्याच्या मजुरीचे दरही बदलतात. मखमल फुलांच्या माळा ओवण्यासाठी एक रूपया मजुरी दिली जाते तर मोठ्या फुलांच्या हारांच्या निर्मितीसाठी अधिक मजुरी दिली जाते.

पाच फुटाच्या लडसाठी तीन ते पाच रुपये मजुरी मिळते. विशेष म्हणजे सध्या या व्यवसायातून अनेक कुटुंबीयांना रोजगार प्राप्त झाला आहे.

शेवंतीच्या वेणीला मागणी

देवीला प्रिय असलेल्या शेवंतीच्या फुलांच्या वेणीला सध्या मोठी मागणी आहे. शेवंतीच्या फुलांपासून बनविलेली एक वेणी बाजारात वीस रूपयांत उपलब्ध आहे. याशिवाय कमलपुष्पांनाही मोठी मागणी आहे.

सद्या बाजारात सर्वच प्रकारच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शेवंतीच्या फुलांपासून बनविलेल्या वेणीला अधिक मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT